शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मुसळधार पावसाने झोडपले, शहरात पाणीच-पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 23:40 IST

सलग तिसऱ्या दिवशी हजेरी : सखल भागात पाणी

राजगुरुनगर : शहराला सतत तीन दिवस वादळी पावसाने झोडपले आहे. जोरदार पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले. राजगुरुनगर शहरात वाडा रस्त्यावर गटार व्यवस्था नसल्याने आज झालेल्या जोरदार पावसाचे पाणी गटारे तुंबल्याने रस्त्यावर आल्याने नागरिकांना रस्ता शोधत जा-ये करावी लागली, तर शहरातील खोलगट परिसरातील गृह सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जोराचा पाऊस झाला. गेली काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता लक्षणीय वाढली आहे. राजगुरुनगर शहर परिसर वगळता इतर ठिकाणी पाऊस पडत होता. राजगुरुनगर शहरात पाऊस पडण्याचे वातावरण तयार होत होते. मात्र, पाऊस पडत नव्हता. त्यातच शहरातील रस्त्यांवर घाण, चिखल थोड्या पावसाने होत होता. मात्र, सतत तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते चकाचक झाले. महात्मा गांधी विद्यालयातील पटांगणात पावसाने मोठे तळे साठले होते. वाडा रस्त्यावर संगम क्लासिकजवळ पावसाचे पाणी साठवून मोठे तळे साचले होते. वादळाने अनेक ठिकाणी घरांचे गोठ्यांचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले. जनावरांसाठी खाद्य केलेले कडवळ मका बाजरी ही उभी पिके शेतात आडवी झाली. नुकतीच लागवड झालेल्या कांद्याच्या शेतात पाणी साठून नुकसान झाले .ज्वारी जमीनदोस्त झाली. किवळ मळ्यातील तुकाराम वाळुंज यांच्या पत्र्याचे छप्पर उडून दोनशे फूट अंतरावर जाऊन पडले . गोठ्याचे पत्रे उडून म्हशीच्या अंगावर पडल्याने म्हशीचा पाय तुटला . वाळुंज यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले . राक्षेवाडी परिसरात लक्ष्मण कोकणे यांच्या गोठ्याचे छप्पर उडून नुकसान झाले . सातकरस्थळ येथील साहेबराव सातकर यांच्या गोठ्यावर झाड पडल्याने नुकसान झाले . वडगाव पाटोळे येथे अनेक घरांचे पत्रे उडून नुकसान झाले .नंदकुमार पाटोळे यांचे मोठे नुकसान झाले.परिसरातील तिन्हेवाडी, सातकरस्थळ, चांडोली, पाडळी, पांगरी, बुट्टेवाडी, वडगाव पाटोळे आदी गावांच्या परिसरात झालेल्या वादळी आणि जोरदार पावसामुळे रस्त्यावर झाडे पडली, पोल्ट्रीफार्म व जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाले. बाजरी ज्वारीची पिके भुईसपाट झाली असून कांदे लागवडीवर परिणाम झाला.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस