शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! दुचाकी - कंटेनर अपघातात बाप - लेक जागीच ठार, दोन जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 21:09 IST

दोघांनाही उपचारार्थ तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून ते किरकोळ जखमी आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत सावंत यांनी दिली.

तळेगाव दाभाडे: दुचाकीला कंटेनरची पाठीमागून जोरात धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात  दुचाकीवरील बाप - लेक जागीच ठार, तर दोनजण जखमी झाले आहेत. हा विचित्र अपघात तळेगाव एमआयडीसी रस्त्यावरील नाणोली फाट्याजवळ शनिवारी (दि.३०) सायंकाळी चारच्या सुमारास झाला. 

अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहनासह पलायन केले.या अपघातात सुनील बाळू वाघमारे (वय २५ ), आर्या सुनील वाघमारे (वय ४, दोघेही रा. राजपुरी ,ता. मावळ, जि.पुणे) हे बाप - लेक गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. अपघाताचे वृत्त समजतात घटनास्थळी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली.या  अपघातात दुचाकीवरील गणेश जाधव, परवीन वाघमारे (दोघेही राहणार टाकवे बुद्रुक, ता. मावळ) हे बाहेर फेकले गेल्याने सुदैवाने बचावले. 

दोघांनाही  उपचारार्थ तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून ते किरकोळ जखमी आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत सावंत यांनी दिली. सुनील वाघमारे हे दुचाकी चालवत होते. नातेवाईकांना भेटल्यानंतर खेड येथून टाकवे बुद्रूक गावाकडे येत असता नाणोली फाट्याजवळ हा अपघात झाला.

कंटेनर अंगावरून गेल्याने सुनील वाघमारे आणि आर्या वाघमारे हे जागीच ठार झाले. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज  चौधरी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात