शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी सुनावणी १३ मार्च रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 02:25 IST

खडकवासला कालव्यावरील सिंचनासाठी प्रशासकीय पातळीवर न्याय मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

कळस : खडकवासला कालव्यावरील सिंचनासाठी प्रशासकीय पातळीवर न्याय मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्याची सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये कालव्यावरील अवलंबून असलेल्या सुमारे ६५ हजार हेक्टर शेतीला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिली.भादलवाडी (ता. इंदापूर) येथील विविध विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, कळसचे सरपंच गणेश सांगळे, डॉ. संजीव लोंढे, बबन खारतोडे, पोलीस पाटील तुकाराम खाडे, तानाजी सांगळे, संदीप वायाळ, दत्तात्रय कन्हेरकर, प्रवीण कन्हेरकर, ज्ञानदेव कन्हेरकर, नाथाभाऊ कुतवळ, बापू भांडवलकर उपस्थित होते. खडकवासला कालव्यावरून पुणे शहराला नेहमीच अतिरिक्त पाणी दिले जात आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील सिंचन अडचणीत आले आहे.गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी आवर्तन दिले जात नाही, त्यामुळे या भागातील पिके जळून गेल्याने मोठे नुकसान झाले होते, ही परिस्थिती कायम असल्याने प्रशासकीय पातळीवर न्याय मागण्याचा प्रयत्न केला; मात्र शहरी भागाला प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील सिंचनावर अन्याय करण्यात आला.पुणे शहराचा पाणीवापर व मागणी वाढतच चालली असल्याने इंदापूर तालुक्यातील व दौंड,हवेली, बारामती या भागातील फळबागा व शेती अडचणीत आली आहे, त्यामुळे न्यायहक्क मागण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे यावर दोनदा सुनावणी झाली असून १३ मार्च रोजी अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट