शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीतल्या गाढवांचा बाजारही नोटाबंदीने हैराण

By admin | Updated: January 13, 2017 02:31 IST

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. बुधवार (दि.११) पासून सुरु झालेल्या बाजारात विविध जातींच्या गाढवांची खरेदी-विक्री होत आह. उद्यासुद्धा बाजार सुरूच राहणार आहे. नोटाबंदीमुळे धनादेशाद्वारे अथवा बोलीवर व्यवहार होत होता. नोटाबंदीचा या बाजारावर मोठा परिणाम जाणवत होता. जेजुरीत भरणारी पौष पौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी -विक्री) पुरातन काळापासून प्रसिध्द आहे. जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून गडाच्या पायथ्याला असलेल्या बंगाली पटांगणात शेकडो वर्षांपासून येथे राज्यातून व राज्याबाहेरून गावगाड्यातील आलेला बारा बलुतेदार, परंपरेतले विविध जातींचे समाजबांधव गाढवांची खरेदी-विक्री करतात. मात्र, सध्या सगळा रोखीचा मामला झाला आहे. या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र या राज्यांसह महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कराड, बार्शी, नगर, बारामती, पुणे, फलटण, जामखेड आदी ठिकाणांवरून वैदू, वडारी, कैकाडी, बेलदार (पाथरवट) आदी समाजबांधव येथे विविध जातींच्या गाढवांसह दाखल होतात. गाढवांच्या खरेदी-विक्रीबरोबरच देवदर्शन, कुलधर्म, कुलाचार, समाजबांधवांमधील मल्लांच्या कुस्त्या लावल्या जातात. आदी धार्मिक कार्यक्रम येथे होतात.पूर्वीच्या काळी गाढवांचा वापर जड मालाच्या वाहतुकीसाठी होत असे. आजच्या यांत्रिक युगामध्ये ओझे वाहण्यासाठी गाढवांचा वापर कमी झाला असला तरी दऱ्याखोऱ्यांमध्ये व डोंगरमाथ्यावर, बहुमजली इमारतीच्या ठिकाणी अथवा जेथे वाहन जाणार नाही अशा ठिकाणी मालाची वाहतूक करण्यासाठी गाढवांचा वापर आजही केला जातो. यंदाही ८०० ते १००० विविध जातींची गाढव जेजुरीच्या बाजारात दाखल झाली होती. विशेषत: राजस्थानी-काठेवाडी जातीच्या गाढवांना सर्वात जास्त २५ ते ३१ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. गावरान -पुणेरी गाढवाला ७ ते १२ हजार रुपये बोली लागत होती. राजस्थानी-काठेवाडी गाढव पांढरेशुभ्र असेल तर कर्नाटक-आंध्र येथून आलेले व्यापारी भावांमध्ये घासाघीस करताना दिसून येत होते. पूर्वीच्या काळी गारुडी, कुंभार, परीट समाजबांधवही बाजारात दिसून येत असे आता मात्र फक्त मोजकेच समाजबांधव दिसतात. दोन दातांचे दुवान हे गाढव तरुण मानले जाते. चार दातांचे चौवान हे मध्यमवयीन, तर कोरा म्हणजे नुकतेच वयात येणारे असे अनुमान काढत त्यांचे दर ठरवले जातात. रंगावरूनही किंमत करण्यात येते. पांढऱ्याशुभ्र जनावराला चांगला दर मिळतो. त्यानंतर गडद जांभळा, तपकिरी लालसर, करडा अशा रंगाच्या प्रतवारीनुसार दर आकारले जात असल्याची माहिती पुणे येथील व्यापारी विजय पवार यांनी दिली.यात्रा फक्त परंपरेसाठीनोटाबंदीचा मोठा फटका खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर दिसून येत असून, काही व्यवहार धनादेशाद्वारे तर काही व्यवहार पुढील काही दिवसांच्या बोलीवर झाल्याचे फलटण येथील मारुती पवार, पुणे येथील बापू धोत्रे यांनी माहिती देताना सांगितले.पूर्वीच्या काळी येथील बाजारात व तीन ते चार दिवस चालणाऱ्या यात्रेत गाढवांच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असे परंतु सध्या परिस्थिती तशी राहिलेली नाही.केवळ वाडवडिलांनी घालून दिलेली येथील परंपरा जोपासण्यासाठी ही यात्रा करावयाची असे काही समाजबांधवांनी सांगितले.