शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

जामीन अर्जावरील सुनावणी तातडीने व्हावी : न्यायमूर्ती नरेश पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 19:42 IST

जामीन मिळविणे हा आरोपींचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, त्यावर लवकर आदेश होत नसल्यामुळे आरोपींना अनेक दिवस तुरूंगात ठेवले जाते...

ठळक मुद्देजिल्हा न्यायाधीशांनी त्याबाबतचा आराखडा करावान्यायाधीशांकडे येणा-या खटल्यांमध्येही मीडीएशन करण्यावर भर पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात दाखलपूर्व खटल्यांमध्ये समुपदेशन करण्यासाठी केंद्र सुरू औरंगाबाद आणि नागपूरला अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्यात येणार

पुणे : जामीन मिळविणे हा आरोपींचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, त्यावर लवकर आदेश होत नसल्यामुळे आरोपींना अनेक दिवस तुरूंगात ठेवले जाते. त्यामुळे जामिनाच्या अर्जांवर लवकर सुनावणी व्हावी यासाठी जिल्हा न्यायालयांच्या प्रमुख न्यायाधीशांनी आराखडा तयार करावा, अशी सुचना मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी शनिवारी केल्या.   महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मेन मीडीएशन मॉनिटरिंग कमिटी आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे अल्पबचत भवन येथे मीडीएशन : कपॅसिटी बिल्डींग, इश्युज अ‍ॅण्ड चॅलेंजेस या विषयावर प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी न्यायमुर्ती पाटील यांनी मार्गदर्शन केले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. ओक, न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी, न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, न्यायमूर्ती रणजित मोरे, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, पुणे जिल्हा न्यायाधीश डी. जी. मुरुमकर यावेळी उपस्थित होते. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी या परिषदेचे नियोजन केले.    न्यायमूर्ती नरेश पाटील म्हणाले की, जामिनाच्या अर्जांची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी. त्यामुळे जामिनाच्या आदेशाची वाट पाहत असलेल्या आरोपींना दिलासा मिळेल. सत्र न्यायालयात चालणारे खटले अनेक महिने रेंगाळतात. न्यायालयाकडून बजावण्यात आलेले समन्स उशिरा पोहचतात. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. काही खटल्यांमध्ये युक्तीवाद ऐकून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. मात्र, त्यावरील निकाल राखून ठेवण्यात येतो. काही प्रकरणांमध्ये २०० दिवसही निकाल राखून ठेवण्यात आल्याची उदाहरणे आहे. अशावेळी दोन ते तीन आठवड्यात निकाल देण्यात यावेत असे न्यायमूर्ती पाटील म्हणाले. समुपदेशनाची संकल्पना लोकांपर्यंत पोहचली असून नागरिकांना या संकल्पनेबद्दल विश्वास वाटू लागला आहे. न्यायाधीशांकडे येणा-या खटल्यांमध्येही मीडीएशन करण्यावर भर दिला जातो आहे. त्यातून मीडीएशनद्वारे निकाली काढण्यात आलेल्या यशस्वी खटल्यांची संख्या वाढते आहे. मीडीएशनमध्ये वकिलांची भूमिकाही महत्त्वाची असते. वकिलांकडून या संकल्पनेला पाठबळ देण्यात येते आहे. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात दाखलपूर्व खटल्यांमध्ये समुपदेशन करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. औरंगाबाद आणि नागपूरला अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिल