शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाकडून ‘मेक इन इंडिया’ योजनेला खो            

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 21:19 IST

पुणे : शासकीय रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात वैद्यकीय उपकरण खरेदीसाठी अमेरिकन किंवा युरोपियन आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. याद्वारे शासनाने ‘मेक इन इंडिया’ या योजनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सजग नागरिक मंचने केला आहे

ठळक मुद्देप्रमाणपत्राची सक्ती रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी योजनेला तिलांजली दिल्याचा आरोप वेलणकर व सहस्त्रबुध्दे यांनी केला आहे

पुणे : शासकीय रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात वैद्यकीय उपकरण खरेदीसाठी अमेरिकन किंवा युरोपियन आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. याद्वारे शासनाने ‘मेक इन इंडिया’ या योजनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सजग नागरिक मंचने केला आहे. तसेच प्रमाणपत्राची सक्ती रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.आरोग्य विभागाने रुग्णालयांमध्ये १९ लाख रुपयांचे बेबी वॉर्मर आणि ३१ लाख रुपयांचे बबल कॅप (एक प्रकारचे बेबी व्हेंटिलेटर) ही उपकरणे खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या दोन्ही निविदांमधील उपकरणांसाठी युएस एफडीए अप्रुव्हल किंवा ईसी सर्टिफिकेशन म्हणजेच अमेरिकन किंवा युरोपिअन आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र असणे सक्तीचे केले आहे, अशी माहिती मंचचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्त्रबुध्दे यांनी दिली.प्रमाणपत्राच्या सक्तीमुळे एकाही भारतीय कंपनीला निविदा भरणे शक्य होणार नाही. भारतीय कंपन्यांनी बनवलेली ही वैद्यकीय उपकरणे अनेक देशांमध्ये निर्यात ही होत असून ती परदेशी कंपन्यांपेक्षा ४० ते ५० टक्क्यांनी स्वस्तही आहेत. असे असतानाही अनावश्यक अट टाकून स्पर्धा तर कमी केली आहे. शिवाय ही यंत्रणाही महागडी मिळणार आहे. तसेच मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी योजनेला तिलांजली दिल्याचा आरोप वेलणकर व सहस्त्रबुध्दे यांनी केला आहे. त्यामुळे निविदेतील ही अट काढून टाकवी आणि ही अट घालणाया अधिकाऱ्यांची यांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVivek Velankarविवेक वेलणकर