-
नीरा :
पुरंदरतालुका पत्रकार संघातील सदस्यांची शुक्रवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. नीरा येथील प्रसिद्ध डॉ. लिलाधर मंदकनल्ली यांनी तालुक्यातील सर्व पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी केली. त्यांना नीरा मेडिकल असोसिएशन, इंडीयन मेडिकल असोसिएशनच्य सदस्य डॉक्टरांनी मदत केली. तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.
मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापण दिना निमित्त प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी परिषदेशी सल्लंग्न असणाऱ्या पत्रकार संघटनांच्या सदस्यांची आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले होते. त्या नुसार शुक्रवार दि. ४ रोजी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांची आरोग्य तपासणीची सोय नीरा शहर पत्रकार संघाच्या वातीने नीरा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा. नीरा मेडिकल असोसिएशन, इंडीयन मेडिकल असोसिएशन शाखा नीरा-लोणंद, आश्विन हॉस्पिटल नीरा यांनी पत्रकारांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये रक्ताच्या विविध तपासण्या, ईसीजी एक्सरे, सोनोग्राफी, हाडांची तपासणी, डोळे, नाक, कान, घसा इत्यादींची तपासणी करण्यात आली.
प्रास्तविक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन भरत निगडे तर आभार महम्मदगौस अतार यांनी मानले.