शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

त्यांनी ८२ व्या वर्षी नृत्यमुद्रा करून जिंकली मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:43 IST

पं. बिरजू महाराजांना रसिकांची उभे राहून मानवंदना

पुणे : ज्येष्ठ कथ्थक कलाकार पं. बिरजू महाराज यांचे पंधरा वर्षांनंतर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या मंचावर पाऊल पडले अन् रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून मानवंदना दिली... माझ्या शिष्यांनी नृत्य सादर केले तरी नाचलो शेवटी 'मीच', अशी भावना त्यांनी व्यक्त करताच 'वाह' असे शब्द रसिकांच्या ओठी उमटले... वयाच्या ८२ व्या वर्षी शरीर थकले तरी नृत्य सादर करण्याची ऊर्मी कायम आहे याची प्रचिती त्यांनी रसिकांना दिली. बैठकीच्या नृत्याद्वारे देहबोली आणि डोळ्यांतील उत्कट भावातून त्यांनी नृत्यरचना सादर करीत सर्वांनाच थक्क केले.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशीचा उत्तरार्ध या ‘चिरतरुण’ कलाकाराच्या आविष्काराने अविस्मरणीय केला. बिरजू महाराजांनंतर शाश्वती सेन आणि पंडित बिरजू महाराज यांची नात रागिनी यांच्या उत्कृष्ट पदलालित्याने रसिकांना खिळवून ठेवले. महोत्सवाच्या दुसऱ्या सत्राचा प्रारंभ मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग पूर्वी सादर केला. भक्तिरसातील काही स्वरचित रचना त्यांनी प्रस्तुत केल्या. त्यांनी राग शुद्ध बराडीदेखील सादर केला. संत तुकारामांचा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल हा अभंग स्वरचित चालीत सादर करून त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना अजिंक्य जोशी (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), अश्विनी मिसाळ (तानपुरा), धनंजय म्हसकर व बिलिना पात्रा (गायनसाथ), अपूर्व द्रविड (टाळ) यांनी साथसंगतकेली. सुरुवातीलाच २५ वर्षांपूर्वी या महोत्सवात आलो होतो जरा उशीरच झाला आहे. महोत्सवाला आलेले सर्व रसिक चांगले आहेत, अशा मराठमोळ्या भाषेत प्रसिद्ध सतारवादक प्रतीक चौधरी यांनी संवाद साधत रसिकांची मने जिंकली. हनुमंत हा सव्वापाच मात्रेचा ‘धिंना धिना तिना तीन’ नवा ताल त्यांनी निर्मित केला आहे. रसिकांना या मात्रेमध्ये समवर कसे यायचे याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले. मिया तानसेन घराण्यापासून चालत आलेल्या १७ तारांच्या पारंपरिक सतारीचे धृपद गायकीच्या अंगाने सादरीकरण करून त्यांनी रसिकांना एक अद्वितीय अनुभूती दिली. सतार आणि तबला यांची अनोखी जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. ६६व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या अभिजात गायकीने झाला. जयजयवंती रागाची प्रस्तुती त्यांनी केली.बिरजू महाराजांनी गायले पंडितजींचे भजनआज पंडितजींची खूप आठवण येत आहे.. कुछ गाकर सुनाओ असे मला पंडितजी नेहमी म्हणायचे; पण गाणं तुम्हालाच शोभते असे मी पंडितजीना म्हणालो असता ‘तूही चांगलं गातोस’ अशी पावती दिली असल्याची आठवण पं. बिरजू महाराज यांनी सांगितली. ‘जाने दो मैको’ ही ठुमरी आणि ‘बोलत नंदकिशोर’ ही रचना त्यांनी बैठकीच्या नृत्याद्वारे सादर केली. पंडितजींची आवडते ‘तूच कर्ता आणि करविता, शरण तुला भगवंता’ हे भजन स्वत: बिरजू महाराजांनी गायले. त्यांच्या या गायनाला उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली. 

टॅग्स :Puneपुणे