शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
5
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
6
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
7
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
8
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
9
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
10
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
11
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
12
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
13
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
14
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
15
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
17
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
18
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
19
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
20
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?

...तो ‘अनमोल’ ठेवा गमावला

By admin | Updated: March 28, 2015 01:03 IST

महाकवी ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेली ‘गीतरामायण’ ही अजरामर कलाकृती साहित्यासह सांगीतिक विश्वात मैलाचा दगड ठरली.

पुणे : महाकवी ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेली ‘गीतरामायण’ ही अजरामर कलाकृती साहित्यासह सांगीतिक विश्वात मैलाचा दगड ठरली. गीतरामायणातील प्रत्येक रचना ज्या नोटेशनवर बांधली गेली, त्या गीतांच्या सर्व नोटेशन एका वहीमध्ये लिहून ठेवण्याचा माझा शिरस्ता होता. मात्र, त्याचे ‘मूल्य’ न समजल्याने त्या वह्या अनवधानाने रद्दीमध्ये टाकल्या गेल्या. त्यामुळे एका उत्तुंग कलाकृतीचा अनमोल ठेवा गमाविल्याची सल आजही मनात असल्याची खंत ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांनी व्यक्त केली. शनिवारी रामनवमीच्या दिवशी गीतरामायणाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त साधलेल्या संवादातून जोग यांनी गीतरामायणातील प्रत्येक रचनेच्या आठवणींचा कप्पा ‘लोकमत’शी बोलताना उलगडला. संगीतात कोणताही जडपणा जाणवू न देणे, अर्थपूर्ण चाली देणे ही बाबूजींची खासियत होती. ‘चला राघवा चला’ हे गीत स्वरबद्ध करण्यासाठी बाबूजींना वेळ मिळाला नसल्याने ते संगीतबद्ध करण्याचे शिवधनुष्य कसे पेलले याची आठवण त्यांनी सांगितली. सुधीर फडके यांची मुंबईला केस चालली होती, त्यामुळे त्यांना गाणे संगीतबद्ध करण्यास वेळ नव्हता, तेव्हा तुम्ही हे गाणे कराल का? अशी विचारणा त्यांनी केली. संपूर्ण गाणं करणे हे माझ्यासाठी आव्हान होते, पण ते मी स्वीकारले. रेकॉर्डिंगच्या वेळी बाबूजी आले. गाणे ऐकून कसं वाटतंय सांगा, असे त्यांना म्हटले, ते गाणे बिहाग रागात बांधले होते.गदिमांकडून गाणे घेऊन येणे ही जबाबदारी माझ्यावर असायची. पंचवटीला गेल्यावर, ‘तू जरा बस’ असे म्हणून केवळ पंधरा मिनिटांत ते गाणे कागदावर उमटवीत असत. एकटाकी लेखन काय असते हे त्यांच्याकडे पाहून उमगायचे. बाबूजींची प्रतिभाही त्याच तोडीची. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गाणे त्यांनी दरबारी कानडात बसविले होते; मात्र त्याला दु:खी छटा येत असल्यामुळे त्यांना ती चाल आवडली नव्हती. गाणे रेकॉर्डिंग होणार होते, तरीही अंतरे केवळ डोक्यात ठेवून त्यांनी गाणे रेकॉर्ड केले. असा अलौकिक संगीतकार आणि गायक पाहिला नसल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)४ वसंत बहार रागातील ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा’ हे गीत बसविण्यासाठी बाबूजींकडे गेलो होतो. तिथे पेटीवर या गीताचा कागद ठेवला होता. त्या गीताचे शब्द वाचल्यानंतर डोक्यात एकदम चाल घोळायला लागली. काही सुचतंय का? असे बाबूजींनी विचारले. त्यांना अस्थाई ऐकवली, खूप छान आहे असा हिरवा कंदील त्यांनी दिला आणि ‘अस्थाई’ माझी झाली, हे सांगताना जोग यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव नकळतपणे उमटले.