शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

प्रेयसीसाठी त्याने भेदली सुरक्षा, लोहगाव विमानतळावरील घटना : संगणक अभियंत्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 6:36 AM

सुरक्षारक्षकांना शंका आल्याने त्यांनी त्याचे तिकीट तपासले, तेव्हा ते चक्क बनावट निघाले. लोहगाव विमानतळावर रविवारी दुपारी पावणे दोन वाजता हा प्रकार घडला. विमानतळ पोलिसांनी संगणक अभियंत्याला अटक केली आहे.

विमाननगर/पुणे : कोलकत्याला जाणा-या प्रेयसीला सोडविण्यासाठी तो विमानतळावर आला होता. पण, सुरक्षेच्या कारणास्तव सध्या व्हिजिटर पास देणे बंद केल्याने त्याने बनावट तिकीट तयार करून, प्रेयसीबरोबर वेळ घालविण्यासाठी आत शिरला़ प्रेयसी पुढील सर्व सुरक्षा सोपस्कार पूर्ण करून आत गेली. तेव्हा तो पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. पण, एकदा आत गेलेल्यांना परत बाहेर येता येत नाही. तेव्हा त्याने आपण प्रवास रद्द करीत आहोत, असे सांगितले़ सुरक्षारक्षकांना शंका आल्याने त्यांनी त्याचे तिकीट तपासले, तेव्हा ते चक्क बनावट निघाले. लोहगाव विमानतळावर रविवारी दुपारी पावणे दोन वाजता हा प्रकार घडला. विमानतळ पोलिसांनी संगणक अभियंत्याला अटक केली आहे.शुभदीप दास गुप्ता (वय ३५, रा़ पोरवाल रोड, लोहगाव) असे या संगणक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी इंडिगो कंपनीचे सुरक्षा अधिकारी शुभजित शांतिभूषण शहा (वय ३३, रा़ परांडेनगर, दिघी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: शुभदीप गुप्ता हा पुण्यातील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता आहे. त्याची प्रेयसी रविवारी दुपारच्या विमानाने लोहगाव विमानतळावरून कोलकत्ता येथे जाणार होती. त्याला त्यावेळी तिला पाठविताना विमानतळावर काही वेळ सोबत घालवायचा होता.विमानतळाच्या आत केवळ प्रवाशांनाच जाऊ दिले जाते. त्यांना सोडण्यासाठी आलेल्यांना त्यांना बाहेरच सोडावे लागते. आत प्रवेश करण्यासाठी विशिष्ट पासही मिळतो. मात्र, सध्या हा पास देणे बंद केले आहे़ मात्र, गुप्ताला आत जायचे असल्याने त्याने इंडिगो एअरलाइन्सच्या तिकिटामध्ये फेरफार करून त्यात स्वत:चे नाव टाकले. त्यासोबतच त्यात तिच्याच तिकिटाचा पीएनआर क्रमांक टाकून तिकीट तयार केले. प्रवाशांना आत सोडताना पहिल्या गेटवर सुरक्षारक्षक प्रवाशांकडे तिकीट आहे का हे पाहतात़, त्याने या तिकिटाच्या आधारे आत तर प्रवेश केला.ती विमानात बसून जाईपर्यंत तो विमानतळाच्या आत जवळपास अर्धा तास होता. आत गेलेल्या प्रवाशांना तेथून पुन्हा बाहेर येता येत नाही़ मात्र बाहेर येताना काऊंटरवर त्याने तिकीट दाखवले. आपण प्रवास रद्द करीत असल्याचे कारण सांगितले़ त्यावेळी त्याचे तिकीट तपासले़ तेव्हा तिकिटावरील पीएनआरए नंबर तोच असला, तरी त्यावरील नाव वेगळे होते़ त्यामुळे सुरक्षा अधिका-यांना शंका आली़ त्यांनी चौकशी केल्यावर त्याने आपण प्रेयसीबरोबर वेळ घालविण्यासाठी हे केल्याचे सांगितले़ सुरक्षा अधिका-याने त्याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले़ पोलिसांनी त्याला अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले़ न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळ