शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

एचसीएमटीआर मारक नव्हे तर ठार मारकच : आरोपांवर अधिकारीही निशब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 12:09 IST

पुणे शहर हे केवळ पालिका प्रशासन व राज्यकर्त्यांचेच नाही तर ते सर्वसामान्यांचेही आहे.

ठळक मुद्दे‘एचसीएमटीआर पुणेकरांसाठी मारक की तारक ’ या चर्चासत्र

पुणे : एचसीएमटीआर (उच्च क्षमता उन्नत वाहतुक मार्ग) प्रकल्प पुणे शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी फायदेशीर आहे, असा दावा रविवारी पालिका प्रशासन व सत्ताधारी प्रतिनिधींकडून केला गेला़. पण प्रतिवाद्यांकडून आलेले प्रश्न व खुलाशांची उत्तरे देण्यास त्यांना सपशेल अपयश आले़ .पुणे शहर हे केवळ पालिका प्रशासन व राज्यकर्त्यांचेच नाही तर ते सर्वसामान्यांचेही आहे. याची जाणीव त्यांना करून दिल्यावर, आम्ही तुमच्या भावना वरिष्ठांकडे नक्की पोहचू हे बोलून वेळ मारून नेण्याची वेळ त्यांच्यावर आली़. सजग नागरिक मंचच्यावतीने आयोजित, ‘एचसीएमटीआर पुणेकरांसाठी मारक की तारक ’ या चर्चासत्रात उपस्थित नागरिकांनी पालिकेचे पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे व सत्ताधारी भाजपचे प्रतिनिधी गोपाल चिंतल यांची बोलती बंद केली़.  प्रारंभी या दोघांनी हा प्रकल्प शहरासाठी किती महत्वाचा आहे, त्यासाठी किती कमी खर्च होईल, त्यात काळानुरूप कसे बदल केले. आदी गोष्टी सचित्र सांगितल्या़. मात्र, या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सारंग यादवाडकर, प्रशांत ईनामदार, अ‍ॅड. रितेश कुलकर्णी यांच्यासह उपस्थित नागरिकांनी आपली बाजू मांडली व यात हा प्रकल्प तारक की मारक नव्हे तर ठार मारक असल्याचे पुराव्यानिशी सादरीकरण केले़. यानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे देताना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गोजारे यांनी, या प्रकल्पावर हरकती सूचना मागविण्याचे काम सुरू झाले असून तो अद्याप अंतिम झालेला नाही, असे सांगितले़. तर प्रकल्पाची निर्मिती, निविदा काढणे यावर मी काय उत्तर देणार मी एक अभियंता आहे़. मी पॉलिसी मेकर नाही, शहर सुधारणा समिती, स्थायी समिती, मुख्य सभा याबाबत निर्णय घेते असे सांगून त्यांनी यावेळी हात झटकले़. सार्वजनिक वाहतुक सुधारणा हा एचसीएमटीआर प्रकल्पाचा मुख्य गाभा आहे. .........पालिका सभेच्या पटलावर हे विषय मांडू : चिंतलएचसीएमटीआरवर चर्चासत्रात एकूण १२७ मुद्दे उपस्थित केले गेले व त्याची नोंद मी घेतलेली आहे़, असे सांगून सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या गोपाल चिंतल यांनी, या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेणे जरूरी असून, मी हे सर्व मुद्दे महापालिकेच्या मुख्य सभेसमोर नक्की मांडेन व मी पुन्हा येईन असे सांगितले़. 

मनपात तज्ज्ञ खूप, पण सुज्ञांची वानवा : यादवाडकर पुणे महापालिकेत तज्ज्ञ खूप आहेत पण सुज्ञांची वानवा आहे़ अशी टीका करीत सारंग यादवाडकर यांनी, पुणे हे केवळ पालिका प्रशासन व राज्यकर्त्यांचे नाही तर ते सर्वसामान्यांचे आहे याची जाणीव ठेवण्याची गरज आहे़. राज्यकर्तेही स्वत:ची आर्थिक गणिते जुळली की प्रशासनाच्या पाठीशी राहतात, असा आरोप करीत, या प्रकल्पाला कडाडून विरोध केला़.  

शंभरचे शून्य होण्यास वेळ लागणार नाही...महापालिकेत आज भाजपचे शंभर नगरसेवक आहेत पण हा प्रकल्प राबविला तर या शंभरमधील एकही जण निवडून येण्याची शक्यता नाही़ हे मी तुमच्याच पक्षाचा एक सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता सांगत आहे़, अशा शब्दांत उपस्थित भाजप कार्यकर्ता म्हणवणाऱ्या गणेश आवटे यांनी चिंतल यांची बोलती बंद केली़. तुम्हाला शहरातील वाहतूककोंडी खरोखरच सोडवायची असेल तर प्रथम तुमचे नगरसेवक, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी यांनी केलेली अतिक्रमणे काढा असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला़..........मी पॉलिसी मेकर नाही : गोजारेएचसीएमटीआरची बाजू मांडणारे पथ विभागाचे दिनकर गोजारे यांना या वेळी उपस्थित समस्यांचे व तांत्रिक मुद्द्यांचे समाधान करण्यास या वेळी सपशेल अपयश आले़. प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी मोघम उत्तरे देऊन विषय वेगळीकडे वळविला़.  उपस्थित नागरिकांनी मुद्द्याचे बोला अशी मागणी केली असता, मी पॉलिसी मेकर नाही, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली़. एचसीएमटीआर प्रकल्पावर सध्या हरकती व सूचना मागविण्याचे काम सुरू आहे, तो अंतिम झालेला नाही़ मी केवळ एक कार्यकारी अभियंता आहे, तुमच्या सर्व प्रश्नांवर मी काय उत्तर देणाऱ प्रकल्प अंमलबजावणीचा निर्णय पालिकेतील शहर सुधारणा समिती, स्थायी समिती व मुख्य सभा घेत असते़.  यानंतरच पालिका प्रशासन त्यावर काम करते, असे सांगून त्यांनी यावेळी एचसीएमटीआरचा चेंडू सत्ताधाऱ्यांच्या कोर्टात टोलवला़. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका