शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही कधी मराठीत प्रपोज केलंय? अरविंद जगताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 12:47 IST

जोपर्यंत इंग्रजीमध्ये 'आय लव्ह यू' म्हणत नाही तोपर्यंत प्रेम व्यक्त केल्यासारखंच वाटत नाही, अशी सध्या स्थिती आहे.

ठळक मुद्देअक्षर मानव युवा विभागाच्या वतीने गप्पांचा कार्यक्रम आयोजित

पुणे : मनातली भावना व्यक्त करण्यासाठी स्वत:च्याच भाषेतले शब्द सापडत नाहीत, यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, अशी खंत व्यक्त करत लेखक अरविंद जगताप यांनी तरुणाईला तुुम्ही कधी मराठीत प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारला.अक्षर मानव युवा विभागाच्या वतीने लेखक अरविंद जगताप यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात यावेळी अक्षर मानव युवा विभागाचे अध्यक्ष सृजन वाटवे, समन्वयक विशाल दाभाडे, संतोष रासवे आदी उपस्थित होते. निखिल बेलोटे यांनी जगताप यांच्याशी संवाद साधला. जगताप म्हणाले, जोपर्यंत इंग्रजीमध्ये 'आय लव्ह यू' म्हणत नाही तोपर्यंत प्रेम व्यक्त केल्यासारखंच वाटत नाही, अशी सध्या स्थिती आहे. आपल्याला आपल्या भाषेत प्रेम व्यक्त करता येत नाही, याचं कुणालाही काहीही वाटत नाही. इतकंच नाही तर अनेक छोट्या छोट्या गोष्टी व्यक्त करण्यासाठीही आपण इंग्रजी भाषेचा आधार घेतो. लघवीला जायचंय हे कुठंच आता ऐकायला येत नाही. त्याऐवजी फ्रेश व्हायचंय, टॉयलेटला जायचंय असं ऐकायला येतं, असे सांगत आपली भाषा मनातले भाव व्यक्त करण्यासाठी इतकी तोकडी नक्कीच नाही, हा मुद्दा अधोरेखित केला.काहीजण बोलताना एक भाषा वापरतात आणि लिहिताना मात्र वेगळ्या भाषेत लिहितात. प्रत्येकानं त्याच्या भाषेतच लिहिलं पाहिजे, तेच लिखाण अस्सल असतं. कधी नव्हे ते अशा अस्सल भाषेत अलीकडे लिहिलं जात आहे. पण त्याचं प्रमाण आणखी वाढलं पाहिजे, असे नमूद केले.  लेखक म्हणून जगायला मला खूप आवडतं. पण लेखन ही व्यायामासारखी गोष्ट नाही. म्हणजे ठरवून लिहिता येत नाही. लेखन हे जमण्यावर असतं. थोडं सुचायला खूप काही जगवंही लागतं, असंही जगताप यांनी सांगितलं. चित्रपटासाठी लिखाण करतानाचे अनुभव या अनुषंगाने श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मनमुरादपणे उत्तरे दिली.

टॅग्स :marathiमराठीrelationshipरिलेशनशिप