शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या सात महिन्यांत हौस पूर्ण करून घ्या - हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 00:28 IST

दुसऱ्याने केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी नारळ फोडून शेवटच्या सात महिन्यांत हौस पूर्ण करून घ्या, असा उपरोधित टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांचे नाव न घेता लगावला.

बावडा - दुसऱ्याने केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी नारळ फोडून शेवटच्या सात महिन्यांत हौस पूर्ण करून घ्या, असा उपरोधित टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांचे नाव न घेता लगावला.लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नाना शेंडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माऊली चवरे, जि.प. सदस्या रत्नप्रभादेवी पाटील, चित्रलेखा ढोले, नीरा-भीमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, उदयसिंह पाटील, अ‍ॅड. अनिल पाटील आदी उपस्थित होते. पाटील यांनी यावेळी आमदार भरणे यांच्यावर टीका करताना सन २०१४ पासून लोकप्रतिनिधीने जेवढे विकासकामांचे नारळ फोडले, त्यापैकी एकतरी काम पूर्ण झाले का, असा सवाल केला. तालुक्याच्या विकास कामांसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच, लाखेवाडी गावात श्रीमंत ढोले व त्यांचे बंधू दिलीप ढोले यांच्या योगदानाचेही कौतुक केले.जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर झालेल्या लाखेवाडी-चाकाटी या रस्त्यास ३५ लाख, रत्नप्रभादेवी पाटील यांच्या जिल्हा परिषद निधीतून ज्योतिबा मंदिर सभामंडप ५ लाख, खारा ओढा रस्त्यासाठी ५ लाख मंजूर झाले असून, या कामांचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. तसेच, भवानी माता गड विकास प्रतिष्ठानने गावात ३० हजार वृक्षलागवडीचा संकल्प केला असून, त्याअंतर्गत नागरिकांना घरटी पाच रोपांचे वाटपही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी आमदार भरणे यांच्या अडवणुकीच्या धोरणावर टीका केली. लाखेवाडी गाव स्मार्ट व ग्रीन करण्याचा संकल्प केल्याचे सांगितले.भाजपा शत्रू नाही : पाटीलकार्यक्रमात बोलताना ढोले म्हणाले की, भाजपा हा आमचा राजकीय शत्रू असताना गावच्या विकासकामात सातत्याने सहकार्य देतो. यावर मध्येच हस्तक्षेप करीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा आपला शत्रू नाही, दुसरेच शत्रू आहेत असे उच्चारताच हशा पिकला.आगामी आमदार भाजपाचाचभाजपाचे या सभेत गोडवे गाऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा मिळण्याची आशा व्यक्त करण्यात आली. त्यावर बोलताना जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माऊली चवरे यांनी इंदापूरचा आगामी आमदार भाजपाचाच असेल. मग, तो कोणाच्याही रूपाने होईल, असे उद्गार काढताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारण