शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

हॅट्स ऑफ! महिलेची जबरदस्त समयसूचकता; पतीची खालावलेली ऑक्सिजन पातळी 'एसी'मुळे वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 21:47 IST

कोरोनाबाधित पतीची खालावलेली ऑक्सिजन पातळी अशी

पिंपरी : कोरोनाने थैमान घातले असताना रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास नातेवाईक घाबरून जातात. मात्र, चिंचवड येथील एका डॉक्टरने मध्यरात्री पतीची ऑक्सिजन पातळी ८६ झाली असताना समयसूचकता ठेवत एसीचा ब्लोअरच उपयोग करून ९४ वर ऑक्सिजन पातळी आणली.

ही घटना आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवडगावातील. कोरोनाचा विळखा वाढत असल्याने हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे कठीण झाले आहे. सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन व्हावे लागत आहे.मात्र, रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर नातेवाईकांची तारांबळ उडत असते. मात्र, समयसूचकता आणि सामान्य ज्ञान, वैद्यकीय क्षेत्राविषयी माहिती असल्याने अशावेळी रुग्णांचा धोका कमी होऊ शकतो. अशीच घटना चिंचवडला घडली. हा संपूर्ण घटनेचा उलगडा डॉ. दीपिका राव यांनी स्वतः केला आहे.

डॉ.दीपिका म्हणाल्या, त्यांचे पती सुहास राव यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दोन दिवस उपचार केल्यानंतर रात्री अचानक दोन वाजेच्या सुमारास त्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला आणि ऑक्सिजनची पातळी तपासल्यानंतर ती ८७ पर्यंतखाली आल्याचं समजलं. इतक्या रात्री तातडीने बेड उपलब्ध करणं अशक्य होतं आणि अशा परिस्थितीत पतीच्या जीवितासाठी धोका निर्माण होऊ शकणार होता. त्यामुळे डॉक्टर असल्याने एसीच्या हवेच्या दाबाने ऑक्सिजन देऊन ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी मदत केली.

‘‘रात्री पतीची ऑक्सिजन पातळी कमी झाली. त्यामुळे घरात असणाऱ्या एसीमधील हवेचा वापर केला. एसीच्या हवेत २१ टक्के ऑक्सिजन असतो. त्यामुळे रात्री एसीचा ब्लोअर सुहास यांच्या तोंडासमोर आणला आणि एसीची हवा त्याला शरीरात घ्यायच्या सूचना दिल्या. साधारण २ ते ३ मिनिटे हा प्रयोग केल्यानंतर त्यांचा ऑक्सिजन पुन्हा पूर्ववत होऊन ९२ वर येऊन स्थिरावला"; असेेेही राव म्हणाल्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरWomenमहिलाOxygen Cylinderऑक्सिजन