शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन अटळ - हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 00:04 IST

हर्षवर्धन पाटील : असत्य गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत

बावडा : सत्तारूढ भाजपाचा पराभव होऊ शकतो,असा संदेश मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या राज्यांतील निवडणूक निकालाने संपूर्ण देशाला मिळालेला आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या आगामी लोकसभा व महाराष्ट्रात होणाºया विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता परिवर्तन अटळ आहे, असा दावा काँग्रेस नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.

शहाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदारांनी नाकारले आहे. शहरी भागात भाजपाला आजपर्यंत चांगले मतदान होत होते. गुजरात निवडणुकीतही शहरी भागातील मतदारांमुळेच भाजपाला सत्ता मिळविता आली. मात्र आता मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या तिन्ही राज्यांत शहरी मतदारांचा आढावा घेतला असता भाजपाविरोधात स्पष्ट कौल देण्यात आल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या सर्वधर्मसमभावाच्या विचारधारेला मतदारांनी पसंती दिली आहे. देशातील मतदारांनी भाजपाच्या घरवापशीचा निर्णय घेतलेला स्पष्टपणे दिसून येत आहे. असत्य गोष्ट लवकर पटते, मात्र ती जास्त काळ टिकत नाही, हे या निवडणुकीत भाजपाला मतदारांनी दाखवून दिलेले आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व सक्षम असल्याचे या निवडणुकीने देशाला तसेच जगातही दाखवून दिले आहे, असे त्यांनी नमूद केले. हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले की, महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भाजपाविरोधात समविचारी पक्षांना एकत्र आणले जात आहे. त्यादृष्टीने आम्ही समविचारी पक्षांशी बोलणी करीत आहोत. तसेच, काँग्रेस आघाडीच्या जागावाटपाची बैठक मुंबईत दि. २० व २१ डिसेंबर रोजी होणार आहे. आघाडीच्या जागावाटप चर्चेत काँग्रेस पक्षाकडून माझा सहभाग राहिलेला आहे.महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तिन्ही राज्यांतील निवडणूक निकालाने नवचैतन्य आलेले आहे. शेतकरी, युवक, महिला, कामगार वर्गाने नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात मतदान केल्याचे या निवडणुकीत दिसून आले आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या वेळी नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे आदी उपस्थित होते.समविचारी पक्ष एकत्रमहाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भाजपाविरोधात समविचारी पक्षांना एकत्र आणले जात आहे.त्यादृष्टीने आम्ही समविचारी पक्षांशी बोलणी करीत आहोत. तसेच, काँग्रेस आघाडीच्या जागावाटपाची बैठकमुंबईत दि. २० व २१ डिसेंबर रोजीहोणार आहे.

टॅग्स :Puneपुणे