शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
3
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
4
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
5
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
6
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
9
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
10
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
11
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
15
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

लोकप्रतिनिधींनी तालुक्याला मागे नेले - हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 02:59 IST

आमच्या हक्काचे पाणी दुसऱ्या तालुक्याकडून वापरले जाते. मात्र निष्क्रिय प्रतिनिधीमध्ये जाब विचारण्याचे धाडसही होत नाही. तालुक्याला मागे नेण्याचे काम सध्याच्या लोकप्रतिनिधींनी केले आहे, अशी खरमरीत टीका आमदार भरणे यांचे नाव न घेता माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

निमसाखर - आमच्या हक्काचे पाणी दुसऱ्या तालुक्याकडून वापरले जाते. मात्र निष्क्रिय प्रतिनिधीमध्ये जाब विचारण्याचे धाडसही होत नाही. तालुक्याला मागे नेण्याचे काम सध्याच्या लोकप्रतिनिधींनी केले आहे, अशी खरमरीत टीका आमदार भरणे यांचे नाव न घेता माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.निमसाखर (ता. इंदापूर) येथे कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी व्यासपीठावर माजी सभापती विलास वाघमोडे, सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव, राजेंद्र गायकवाड, बाळासाहेब डोंबाळे, महावीर गांधी, रणजित रणवरे, जयकुमार रणवरे, युवराज रणमोडे, लालासाहेब चव्हाण, महादेव घाडगे, सुभाष काळे यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.या वेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की आपली लढाई वाईट प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी आहे. विरोधक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. लोणीच्या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना संरक्षण नसल्यामुळे उद्योगांचे विस्तारीकरण होत नसून, बेरोजगारीत वाढ होत आहे. भाटघर धरणातील पाण्यावरती इंदापूरकरांचा हक्क असून खडकवासला धरणातील ४0 हजार एकरांच्या पाण्यावरती इंदापूरकरांचा हक्क आहे. हे पाणी कुठे जात आहे, असा प्रश्न या वेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केला.नमसाखरला स्मशानभूमीसाठी ५ लाख ६0 हजार रुपयांचा निधी दिला असून, शेवटच्या माणसापर्यंत कामे पोहोचवल्यामुळे आम्हाला प्रसार आणि प्रचाराची गरज कधीही वाटत नाही. विरोधकांकडून जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम होत आहे.- करणसिंह घोलपपंचायत समिती सभापती

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारण