शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

कष्ट केल्याशिवाय यश नाहीच : भूषण गोखले; पुण्यात स्काऊट-गाईड पथकाचा शताब्दी वर्ष मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 12:16 IST

आयुष्यात असे कार्य प्रत्येकाने करायला हवे, ज्यामुळे आपल्या आई-वडिलांना आणि देशाला अभिमान वाटेल, असे प्रतिपादन एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी केले.  

ठळक मुद्देस्वत:चा विचार करीत असताना समाजाचा देखील विचार करणे आवश्यक : भूषण गोखले मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला शंभर पतंग एकाच वेळी आकाशात उडवण्याची स्पर्धा

पुणे : आयुष्यात कष्ट केल्याशिवाय कोणत्याही कामात यश मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, हे ब्रीदवाक्य आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजे. स्काऊटिंगच्या माध्यमातून शिकलेल्या सर्व गोष्टी कायम लक्षात ठेवल्यास त्याचा भविष्यकाळात आजच्या पिढीला नक्कीच उपयोग होईल. आयुष्यात असे कार्य प्रत्येकाने करायला हवे, ज्यामुळे आपल्या आई-वडिलांना आणि देशाला अभिमान वाटेल, असे प्रतिपादन एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी केले.  श्री शिवाजी कुल या पुण्यातील पहिल्या स्काऊट-गाईड खुल्या पथकाच्या शताब्दी वर्ष उद्घाटन मेळाव्याचे आयोजन सदाशिव पेठेतील पंतसचिव स्काऊट क्रीडांगण येथे करण्यात आले होते. या वेळी पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे, रमेश जोशी, संस्थेचे कुलमुख्य आदित्य धायगुडे, श्रेया मराठे, पुष्कर भराडिया, कुलसप्ताह समितीप्रमुख शिवाजी रोडे यांसह आजी व माजी कुलवीर, पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमात शतगौरवार्थींचा सन्मान, स्काऊटची प्रात्यक्षिके आणि ‘श्री शिवाजी कुल-खरी कमाई’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. भूषण गोखले म्हणाले, ‘आयुष्यात कितीही मोठे यश संपादन केले, तरीसुद्धा आपले पाय जमिनीवर असणे आवश्यक आहे. तसेच स्वत:चा विचार करीत असताना समाजाचा देखील विचार करणे आवश्यक आहे.’ 

किरण पुरंदरे म्हणाले, ‘सह्याद्रीच्या डोंगररागांना भेटल्यावर निसर्गाची समृद्धी समजते. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत.’ कार्यक्रमात बालगटासह कब, बुलबुल, स्काऊट, गाईड विभागाची नयनरम्य प्रात्यक्षिके सादर झाली. कार्यक्रम कुलसप्ताह या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटनही झाले. रमेश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. ऋषीकेश खाडे याने सूत्रसंचालन केले. अरुंधती जोशी हिने आभार मानले. 

पतंग उडवण्याचा उपक्रम यंदा संस्थेच्या कुलसप्ताह क्रीडा सप्ताहामध्ये एका नावीन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या शताब्दीनिमित्त शंभर पतंग एकाच वेळी आकाशात उडवण्याची स्पर्धा मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सदाशिव पेठेतील स्काऊट ग्राऊंडवर होणार आहे. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. पुणेकरांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

टॅग्स :Puneपुणे