'लोकमत'च्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी आयोजित स्नेहसोहळ्यास विविध मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छांचा वर्षाव केला. राजकीय, सामाजिक, प्रशासन, कला, क्रीडा, उद्योगासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठय़ा संख्येने सोहळ्यास उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त 'लोकमत'तर्फे 'स्मार्ट सिटी'या संकल्पनेवर प्रसिद्ध केलेल्या पुरवणीचे प्रकाशन करताना (डावीकडून) आमदार डॉ. नीलम गोर्हे, महापौर दत्तात्रय धनकवडे, राज्याचे जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी, संपादक विजय बाविस्कर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, भारतीय अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे.
लोकमत'वर वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
By admin | Updated: December 29, 2014 06:47 IST