सिंंहगड रस्ता : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी येथील २७; तसेच काही मोठ्या हॉटेलची अतिक्रमणे हटविण्यात आली. मागील पंधरा दिवसांपूर्वीही अशीच कारवाई करण्यात आली होती.पानमळा परिसरातून कारवाईस प्रारंभ झाला. पालिकेच्या टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयाचे शाखा अभियंता धनंजय गायकवाड, सहायक अजय गोळे यांच्या नेतृत्वाखाली १० हजार स्क्वेअर फुटांपर्यंत अतिक्रमणे हटविण्यात आली. कारवाईस कोणीही विरोध न करता, सहकार्याची भूमिका घेतल्याचे धनंजय गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)
सिंहगड रस्त्यावर अतिक्रमणांवर हातोडा
By admin | Updated: October 30, 2015 00:24 IST