शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनाई-शिरसाई योजनेच्या कार्यालयात तळीरामांचा हैदोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 01:36 IST

दौैंड येथील जनाई-शिरसाई योजनेच्या कार्यालयाच्या परिसरातील एका खोलीच्या दरवाजाला मद्यपींनी लाथा मारून दरवाजा उघडून हैदोस घातला. त्यामुळे शासकीय खोलीतील कागदपत्रांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

दौैंड  - दौैंड येथील जनाई-शिरसाई योजनेच्या कार्यालयाच्या परिसरातील एका खोलीच्या दरवाजाला मद्यपींनी लाथा मारून दरवाजा उघडून हैदोस घातला. त्यामुळे शासकीय खोलीतील कागदपत्रांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शिवाय त्या मद्यपींवर दिवसभरात कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.ही घटना रात्री १२ च्या सुमारास ही घडली. संबंधित कार्यालयाच्या पहारेकऱ्याला रात्री ड्युटी नेमून दिलेली आहे. परिणामी पहारेकरीच नसल्यामुळे सर्रासपणे तळीरामांचा धुमाकूळ सुरू असतो.येथील प्रशासकीय इमारतीच्या समोर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालय होते. ते कार्यालय पुणे येथे स्थलांतरित झाले असल्याचे समजते. सध्याच्या परिस्थितीत या कार्यालयातून जनाई-शिरसाई योजनेचे काम चालते.या कार्यालयाला लागून दोन खोल्या आहेत. या दोन्ही खोल्यांमध्ये लघु पाटबंधारे विभागाची महत्त्वाची कागदपत्रे ठेवलेली आहेत.परंतु या दोन्ही खोल्यांचे दरवाजे कमकुवत आहेत. तसेच या कार्यालयाच्या व्हरांड्यामध्ये सायंकाळी तळीरामांचा अड्डा भरतो.कार्यालयाच्या समोर मोठे मैैदान असल्यामुळे तळीराम दारू पिऊन बाटल्या मैैदानात फेकतात.त्यामुळे सकाळी मैैदानावर बाटल्या आणि बाटल्यांच्या काचांचाखच असतो. याचा परिणामपहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना सोसावा लागतो. त्यामूळे तळीरामांवर कारवाईची मागणीवाढत आहे.लघु पाटबंधारे विभागाचे कागदपत्र ज्या खोल्यांमध्ये ठेवलेलीआहेत, त्या खोल्यांच्या खिडक्या सर्रासपणे उघड्या असतात. तर दरवाजेही कमकुवत आहेत. तेव्हा नशेत सिगारेट ओढताना काडी खिडकीतून आत टाकल्यास सर्व कागदपत्रे जळून जाऊ शकतात,याचा शासनाने विचार करून या कार्यालयाच्या परिसरातनित्यनियमाने पहारेकरी कार्यरत ठेवावा. वास्तविक पाहता पहारेकºयाची ड्युटी असताना हा पहारेकरी रात्रीच्या वेळेला नेमका कुठे गायब असतो, हा मात्र संशोधनाचा विषय आहे.अतिप्रसंग टळलागेल्या वर्षी या कार्यालयाच्या परिसरात सायंकाळी १४ फेब्रुवारी २0१८ रोजी काही तळीराम दारू पित बसले होते. दारूच्या नशेत अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी एका तरुणीचा हात धरून तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यावर परिसरातील एका कन्स्ट्रक्शनच्या कामावर असलेला पहारेकरी धावून आला अणि पुढील अतिप्रसंग टळला होता.जनाई-शिरसाई योजनेच्या परिसरात असलेल्या खोल्यांमध्ये लघु पाटबंधारे विभागाची कागदपत्रे आहेत. मात्र महत्त्वाची कागदपत्रे हलविण्यात आलेली आहेत. जी कागदपत्रे शिल्लक आहेत तीदेखील हलविणार आहे. तसेच पहारेकरी नित्यनियमाने या ठिकाणी कामकाज करीत असतो. कागदपत्रांच्या खोलीचे दरवाजे व्यवस्थित बसविण्याच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे.- तेजस्विनी राऊतअभियंता, जनाई-शिरसाई योजना

टॅग्स :Puneपुणे