शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या शिक्षण संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत - सत्यपाल सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:57 IST

भारत तरुणांचा देश आहे, या तरुणांना दिशा देण्यासाठी दर्जेदार शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था असली पाहिजे. आज केवळ १० टक्के शिक्षण संस्था उत्कृष्ट कामगिरी करीत असून, ४० टक्क्यांपेक्षा अधिक संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी केले.

पुणे : भारत तरुणांचा देश आहे, या तरुणांना दिशा देण्यासाठी दर्जेदार शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था असली पाहिजे. आज केवळ १० टक्के शिक्षण संस्था उत्कृष्ट कामगिरी करीत असून, ४० टक्क्यांपेक्षा अधिक संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी केले.एमआयटीच्या वतीने आयोजित दुसºया नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या समारोपाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंग बोलत होते. या वेळी एशियन हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक राजीव सेठी, अलका सिंग, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. अगरवाल यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ. सिंग म्हणाले, ‘डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक, पत्रकार यांसारखी समाजाचे आरोग्य सांभाळणारी माणसे आजकाल आत्महत्या करत आहेत, गुन्हे करत आहेत. हे सगळे पाहिल्यानंतर समाजाचे आरोग्य धोक्यात आल्याचे जाणवते. सृजनशीलता, संशोधन आणि आध्यात्म यांच्या संगमातून चारित्र्यसंपन्न नागरिक घडू शकतो. मेकॉलेने आदर्श भारतीय शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणली व गुलामगिरी निर्माण करणारी व्यवस्था आणली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आपण त्याला सावरू शकलेलो नाही.डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ‘अनेक देश वैदिक शिक्षणाकडे वळत आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे. सर्व प्रकारच्या शिक्षकांसाठी एखादी संस्था असली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.’उच्च शिक्षित विद्यार्थी शिपाई पदासाठी!शिपाई पदासाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करीत आहेत, ही बाब चिंतेची आहे. आंतरशाखीय शिक्षणाचा उपयोग करून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. तशा प्रकारची धोरणे आखली पाहिजेत, असे मत राजीव सेठी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणे