शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडच्या नगरसेविकांमध्ये ' हेअर स्टाईल' ची क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 20:15 IST

पिंपरी महानगरपालिकेच्या महिला नगरसेविका विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

ठळक मुद्देमहापालिकेच्या वर्तुळात चर्चा अधिकारी महिलांमध्येही वाढले स्ट्रेटनिंग, स्मुदनिंगचे आकर्षण

शीतल मुंडे - 

पिंपरी : सध्या तरुणाईमध्ये जिन्स, शर्ट, बूट, कॉलेज बॅग याचे क्रेझ बघायला मिळते. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविकांमध्ये नेहमीच विविध प्रकारच्या साड्या व बांगड्यांमध्ये स्पर्धा बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून मात्र नव्या हेअर स्टाईलची क्रेझ वाढली आहे. अनेक नगरसेविकांबरोबर महिला अधिकारी व कर्मचारीही '' स्ट्रेटनिंग व स्मुदनिंग '' या हेअर स्टाईलकडे आकर्षित होत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये महिला नगरसेविकांची संख्या ६४ आहे. त्यामध्येही पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या महिलांची मोठी संख्या अधिक आहे. नेहमीच या नगरसेविका विविध कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या काही नगरसेविका नव्या  हेअर स्टाइलमुळे चर्चेत आहेत.  केसांना हायलाइट करणे, हेअर स्पा, स्ट्रेटनिंग  व स्मुदनिंग करणे याची एक क्रेझच झाली आहे. सुरुवातीला काही हातावर मोजण्याएवढ्या नगरसेविकांनी स्ट्रेटनिंग केले होते. याबाबत एका नगरसेविकेला विचारले असता त्यांनी सांगितले की, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जावे लागते. प्रभागामध्ये विविध उद्घाटने असतात. कधी लग्नाला, तर कधी साखरपुड्याला अचानक जावे लागते. प्रत्येक वेळी चांगले दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळदेखील नसतो. आणि स्ट्रेटनिंग व स्मुदनिंग केल्यानंतर चेहरा चांगला दिसतो. केसामध्ये गुंता होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यांत एक किंवा दोन वेळा हेअर स्पा करावा लागतो. स्ट्रेटनिंग, स्मुदनिंग, हेअर स्पा व हायलाइट करण्यात काही नगरसेविका आघाडीवर आहेत. नगरसेविकांकडे बघून अधिकारी महिला देखील स्ट्रेटनिंग, स्मुदनिंग केल्याचे दिसत आहे.स्टाईल खर्च                    स्ट्रेटनिंग                  स्मुदनिंग                  शॅम्पो हेअर स्पा

२००० ते ८०००                ३००० ते ९०००      १००० ते ३०००              ८०० ते ३०००

सध्या पिंपरी-चिंचवड शहरात स्ट्रेटनिंग, स्मुदनिंग हेअर स्टाईल करण्याचे प्रमाण १९ ते ६० वयाच्या महिलांमध्ये वाढले आहे. कारण स्ट्रेटनिंग, स्मुदनिंग केल्यानंतर केसांमध्ये गुंता होत नाही. केसांच्या सौंदर्यात वाढ झाल्याने प्रत्येक वयातील महिला सुंदर दिसते. मात्र, स्ट्रेटनिंग केल्यानंतर केसांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी वेळ व पैसा खर्च करण्याची तयारी असते, त्या महिलाचा कल वाढत आहे. - विद्या खोत, ब्यूटी पार्लर संचालिका.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला