शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मांजरेवाडी परिसरात रानडुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:02 IST

पिकांचे नुकसान : प्रतिकार करताच शेतकऱ्यांवरच करतात हल्ला

दावडी : खेड तालुक्यातील मांजरेवाडी, टाकळकरवाडी येथे रानडुकरांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे शेतकºयांनी लावलेले कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. या परिसरात रोज रानडुकरांचा धुमाकूळ पाहायला मिळतो. याबाबत अनेकदा तक्रार करूनही वनविभागाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. मांजरेवाडी येथील एक शेतकरी भगवान मांजरे यांच्या शेतात रानडुकरांनी धुमाकूळ घालून संपूर्ण कांदापिकाचे नुकसान केले आहे.

जवळपास दोन एकर शेतातील कांदापिकाचे नुकसान झाले आहे. मांजरेवाडी, टाकळकरवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी डोंगरालगत आहेत. या परिसरात रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. रानडुकरांच्या टोळ्या या परिसरात फिरत आहेत.शेतकऱ्यांनी घेतलेले कांदापिक, बटाटा, तसेच मकापिकाची कणसे रानडुकरे खाऊन नुकसान करीत आहेत. तसेच कधी भारनियमन असल्यास शेतकºयांना रात्रीच्या वेळी पिकांना द्यावे लागते. या रानडुकरांच्या टोळीच्या भीतीमुळे शेतकरी रात्रीचे पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत. तसेच शेतकºयांनी प्रतिकार केला असता, ही रानडुकरे शेतकºयांच्याच अंगावर धावून येत आहेत. रानडुकरांच्या सततच्या त्रासामुळे या परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.पिकांचे नुकसानखेड तालुक्याच्या पूर्व भागात कांदा हेच प्रमुख पीक असताना कमी पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत आहे. परंतु पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेतच रानडुकरांनी संपूर्ण पिकाची नासाडी केली आहे.वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुंपण करतो. त्यात मात्र एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास वनविभाग शेतकºयाच्याच मानगुटीवर बसतो.४शेतकºयांच्या तोंडचा घास काढून न घेता शासनाने वन्यप्राण्यांची योग्य दखल घेऊन त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी