शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

ऑनलाइन मतदार नाव नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात हडपसर टॉप तर जुन्नर फ्लॉप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 14:48 IST

लोकसभेच्या मावळ मतदारसंघात शहरातील पिंपरी आणि चिंचवड तर शिरुर मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : ऑफलाइन पद्धतीनुसार दौंडला केवळ ३४० अर्ज दाखललोकसभा निवडणुकीसाठी जानेवारीमध्ये निवडणूक आयोगातर्फे प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध गतवर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून निवडणूक आयोगाने मतदारनोंदणी

- नारायण बडगुजर -  पिंपरी : पुणे जिल्ह्यात विधानसभेचे २१ मतदारसंघ आहेत. यातील हडपसर मतदारसंघात ऑनलाइन पद्धतीने सर्वाधिक म्हणजे २७,७०८, तर जुन्नर मतदारसंघात केवळ ११४७ मतदारांची मतदार यादीत नाव नोंदणी झाली.ऑफलाइन अर्थात थेट अर्ज भरून देण्याच्या पद्धतीत जिल्ह्यात भोसरीत सर्वाधिक म्हणजे ६६६१ मतदारांनी नावनोंदणी केली. दौंड मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे केवळ ३४० मतदारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून नावनोंदणी केली.  लोकसभेच्या मावळ मतदारसंघात शहरातील पिंपरी आणि चिंचवड तर शिरुर मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ झोपडपट्टीबहुल आहे. त्यामुळे मागासवर्गीय मतदार येथे मोठ्या संख्येने आहेत. चिंचवड मतदारसंघ हिंजवडी आयटी पार्कला लागून आहे. त्यामुळे या मतदारसंघात आयटीयनची वास्तव्य अधिक आहे. अशीच परिस्थिती भोसरी मतदारसंघात आहे. तळवडे येथे सॉफ्टवेअर पार्क आहे. त्यामुळे या परिसरात तसेच मोशी परिसरातही आयटीयनची मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. हा परिसर भोसरी विधानसभा मतदारसंघात मोडतो. त्यामुळे या मतदारसंघातही मतदान यादीत ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. पुण्यातील मगरपट्टा सिटी आणि परिसरात आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कर्मचारी अर्थात आयटीयन हडपसर परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे या मतदारसंघात ऑनलाइन पद्धतीने मतदार यादीत नावनोंदणीवर येथील मतदारांनी भर दिल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीसाठी जानेवारीमध्ये निवडणूक आयोगातर्फे प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. तत्पूर्वी गतवर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून निवडणूक आयोगाने मतदारनोंदणी केली. त्यानंतर पुन्हा ऑनलाइन व ऑफलाइन मतदार नोंदणीसाठी जनजागृती केली. त्याला नवमतदारांनी प्रतिसाद देत नोंदणी केली. 

पुणे जिल्ह्यात विधानसभेचे २१ मतदारसंघ असून, त्यांची मतदार नोंदणीची आकडेवारी पुढील प्रमाणे :आॅफलाईन मतदारनोंदणी (१ जानेवारी ते ३० मार्च २०१९)जुन्नर - २३४४आंबेगाव - २६५९खेड आळंदी - ४५४९शिरुर - २१५२मावळ - २८८९चिंचवड - ६२४८पिंपरी - २७१५भोसरी - ६६६१हडपसर - ४८८४

आॅफलाईन मतदारनोंदणी (१ जानेवारी ते २५ मार्च २०१९)दौंड - ३४०इंदापूर - २९६०बारामती - ३४४७पुरंदर - २१७५भोर - ५०९२वडगाव शेरी - ४१५८शिवाजीनगर - २५१७कोथरुड - ४६३९खडकवासला - ३८९७पर्वती - ३९१३पुणे कॅन्टोन्मेंट - ३२५८कसबा पेठ - १४३४

----------------------

ऑनलाईन मतदारनोंदणी (१ ऑक्टोबर २०१८ ते ३० मार्च २०१९)जुन्नर - ११४७आंबेगाव - १४५०खेड आळंदी - २३८०शिरुर - १२३९०मावळ - २८८६चिंचवड - १९१४२पिंपरी - ३४६७भोसरी - ९२०१हडपसर - २७७०८

ऑनलाईन मतदारनोंदणी (१ ऑक्टोबर २०१८ ते २५ मार्च २०१९)दौंड - ५७३३इंदापूर - १२७०बारामती - १६४०पुरंदर - ३३०४भोर - २९४४वडगाव शेरी - १४३९९शिवाजीनगर - ३२५५कोथरुड - ९८३६खडकवासला - ९७५६पर्वती - ३७०८पुणे कॅन्टोन्मेंट - ३२८०कसबा पेठ - २६५५

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpune-pcपुणेmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानonlineऑनलाइन