शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘एनएच ९६५’चे बाधित शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:37 IST

उपोषणाचा पाचवा दिवस; काही शेतकऱ्यांना जमिनींचे अधिग्रहण केल्याची माहितीच नाही; प्रांताधिकाऱ्यांनी विश्वासात न घेतल्याचा आरोप

इंदापूर : इंदापूर तालुक्यातून प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या कामाला सुरुवात झाली असून, शासनाने काही इंग्रजी व मराठी वर्तमानपत्रांतून भूमी अधिग्रहण केल्याचे राजपत्र जाहीर केले. परंतु राजपत्रात ज्या शेतकºयांची नावे आहेत, त्यांतील काही शेतकºयांना अजूनपर्यंत शासनाची कोणतीही नोटीस आलेली नाही. शासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी आक्रमक झाले असून संपूर्ण माहिती मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती कृती समितीचे सल्लागार अ‍ॅड. राहुल मखरे यांनी दिली. शुक्रवारी संपाचा पाचवा दिवस होता.राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी शासनाच्यावतीने ताब्यात घेण्यास जलदगतीने हालचाली सुरू आहेत. ज्या जागेतून महामार्ग जाणर आहे, त्यातील गायरान जागेत राहणाºया कुटुंबांना काय मोबदला मिळणार? असा सवाल गायरानातील शेकडो कुटुंबे शासनाला विचारत आहेत. शेतकºयांना विश्वासात न घेता, अधिग्रहण चालू असल्याचा आरोप कृती समितीच्यावतीने प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्यावर करण्यात आला आहे.भूमिअधिग्रहण करण्यासंदर्भात बाधित शेतकरी समितीकडून १ सप्टेंबर रोजी संपूर्ण माहिती मागण्यात आली होती. ती उपलब्ध झाली नसल्याने शेतकºयांनी १० सप्टेंबर रोजी साखळी उपोषणाला सुरुवात केली असून, शुक्रवारी या संपाचा पाचवा दिवस होता. शेतकºयांच्या समस्यांची शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसून त्यांना कधी न्याय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.साखळी उपोषणाच्या ठिकाणाला प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी भेट देऊन बाधित शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. बाधित नसणारेच लोक आंदोलन करीत आहेत, असे दिशाभूल करणारे वाक्य ते बोलताच गायरान बाधित लोक आक्रमक झाले. यामुळे वातावरण काही काळ तंग झाले होते. यावेळी राजेंद्र कुरुळे, अशोक भोसले, नेताजी लोंढे, मंगेश घाडगे, महेश लोंढे, केशव सुर्वे, महेश भाळे, प्रकाश चौगुले आदी गायरान बाधित शेतकरी उपस्थित होते.बारामती उपविभागीय प्रांताधिकारी शेतकऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोपबारामती उपविभागीय प्रांताधिकारी हेमंत निकम हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या भूमिअधिग्रहणाच्या कामात कसूर करीत आहेत. बाधित शेतकºयांना विश्वासात न घेता, ज्या कंपनीला काम दिले आहे त्या कंपनीच्या बाजूने अनुकूल निर्णय ते घेत आहेत. यामुळे त्यांची बदली करून या कामासाठी सक्षम अधिकाºयांची नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन कृती समितीचे अध्यक्ष बाबासाहेब भोंग, उपाध्यक्ष राहुल शिंगाडे, महासचिव संजय कांबळे, कार्याध्यक्ष दत्तात्रय मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्ग