शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

गुटखा, सुगंधित सुपारीवरील बंदी वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 21:20 IST

गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सुपारीवरील बंदीची मुदत आणखी एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे.

ठळक मुद्देएफडीए : वाहतुकीवर देखील घातली बंदीसरकारने बंदी कालावधी वाढविल्याचा अध्यादेश गुटखा, पानमसाला, तंबाखू, खर्रा, मावाअशा एकत्र अथवा वेगवेगळ्या पुडी विकण्यास प्रतिबंध

पुणे : गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सुपारीवरील बंदीची मुदत आणखी एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे. या निर्णयात वाहतुकीवर देखील बंदी घातल्याने बंदी घातलेल्या पदार्थांची वाहतुक करणाऱ्यांना देखील जरब बसणार आहे. राज्य सरकारने २०१२ साली राज्यात गुटखाबंदी लागू केली. त्याच्या पुढच्याच वर्षी (२०१३) सुगंधित आणि स्वादिष्ट सुपारीवर देखील बंदीचा सरकारने निर्णय घेतला. एफडीएच्या अधिकारात दरवर्षी या पदार्थांवरील बंदीचा कालावधी वर्षभराने वाढविण्यात येत आहे. या बंदीचा कालावधी संपल्याने शुक्रवारी (दि. २०) बंदी कालावधी वाढविल्याचा अध्यादेश सरकारने काढला. त्यामुळे गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट-सुगंधित तंबाखू, मिश्रणयुक्त तंबाखू, खर्रा, मावा अशा एकत्र अथवा वेगवेगळ्या पुडीत अथवा कोणत्याही स्वरुपात विकण्यास प्रतिबंध घातला आहे. या पदार्थांची निर्मिती, साठवण, वितरण, विक्री आणि वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. पुर्वीच्या आदेशात वाहतुकीवरील बंदीचा समावेश नव्हता. परिणामी अनेकदा न्यायालयीन प्रक्रियेत अडचणी उद्भवत होत्या. त्यामुळे वाहतुकीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. अवैधरित्या प्रतिबंधित वस्तूंची वाहतुक करणाºयांवर अधिक वचक बसेल. गुटखा, पानमसाला, तंबाखू आणि सुपारीमुळे हायपर मॅग्नेशिया, हृदयरोग, तोंडाचा कर्करोग, ल्युक्योप्ल्याकिया, अन्न नलिकेचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, प्रजनस्वास्थ, जठर, आतडे व श्वसनाचे आजार होतात. एफडीएमार्फत ११५३ नमुन्यांची चाचणी केली असता, त्यात घातक अशा मॅग्नेशियम काबोर्नेटचे घटक आढळून आले होते. टाटा रुग्णालयासह विविध संस्थांनी देखील गुटखा, पानमसाला आणि सुपारीच्या घातकतेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुटखा, तंबाखू आणि सुगंधित सुपारीवर बंदी घातली होती. ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे आॅफ इंडिया यांनी २००९-२०१०मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ३५ टक्के व्यक्ती कोणत्याना कोणत्या प्रकारे तंबाखू सेवन करीत असल्याचे आढळून आले होते. राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेच्या अहवालात १६ कोटीपेक्षा अधिक लोक धूम्रविरहीत तंबाखूचा वापर करतात, असे अध्यादेशात म्हटले आहे. ----------------

गुटख्याचा जप्त साठा रुपयांत 

साल        रुपये (कोटींमध्ये)२०१२-१३     २०.४७२०१३-१४     १५.६६२०१४-१५    १७.५३२०१५-१६    २४.३७    २०१६-१७६    २२.९८२०१७-१८    ३९.८४२०१८-१९जुलैपर्यंत    १४१.१३-----------------------

टॅग्स :PuneपुणेFDAएफडीएGovernmentसरकार