शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गुंड आप्पा लोंढे खून खटल्याची सुनावणी येरवडा कारागृहात; लॉकडाऊननंतर पूर्णवेळ सुरू होणारा पहिला खटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 12:02 IST

कारागृह न्यायालयात खटल्याची नियमित सुनावणी होणारा हा पहिलाच खटला 

ठळक मुद्देलॉकडाऊननंतर पूर्णवेळ सुरू होणारा पहिला खटला

पुणे : कुख्यात गुंड आप्पा लोंढे यांच्या खून खटल्याची सुनावणी २० जानेवारीपासून येरवडा कारागृहातील न्यायालयातच सुरू होणार आहे. सत्र व विशेष मोक्का न्यायाधीश ए. एस. सिरसीकर यांच्यासमोर येरवडा कारागृहाच्या आवारातील न्यायालयात ही सुनावणी दररोज होणार आहे. विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. विकास शहा कामकाज पाहणार आहेत.

या प्रकरणात मोक्कानुसार संतोष भीमराव शिंदे, नीलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनील महाडीक, नितीन महादेव मोगल, विष्णू यशवंत जाधव, नागेश लक्ष्मण झाडकर, मनी कुमार चंद्रा ऊर्फ अण्णा, विकास प्रभाकर यादव, गोरख बबन कानकाटे, अण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारी, प्रमोद ऊर्फ बापू काळुराम कांचन, सोमनाथ काळुराम कांचन, रवींद्र शंकर गायकवाड, प्रवीण मारुती कुंजीर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आप्पा लोंढे याचा भविष्यात जमीन, वाळूच्या व्यवहारात आणि इतर धंद्यांत अडसर होऊ नये म्हणून आरोपींनी त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अप्पा लोंढे हा २८ मे २०१५ रोजी सकाळी मॉर्निग वॉकला जात असताना गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला होता.

या खटल्यात आरोपींची संख्या अधिक आहे. तसेच, आरोपींनी आमच्या समोर खटल्याचे कामकाज चालावे. आम्हाला वकिलांशी बोलता येत नाही, असे सांगितले होते. त्यामुळे या सर्व आरोपींना बुधवारी जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. आरोपींना दररोज जिल्हा न्यायालयात हजर करताना सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच न्यायालयात गर्दी होऊ शकते. त्यामुळे कारागृहात उभारण्यात आलेल्या न्यायालयात या खटल्याची दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विशेष सरकारी वकील विकास शहा यांनी सांगितले.

लॉकडाऊननंतर पूर्णवेळ सुरू होणारा पहिला खटलाजनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणाऱ्या जिंदा सुखा यांच्यावरील खटल्याची सुनावणी येरवडा कारागृहात झाली होती. येरवडा कारागृहात मुख्य गेटजवळ कोर्ट तयार करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आरोपींना न्यायालयात आणणे अशक्य असल्याने या न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपींना हजर केले जात होते. यापूर्वी येथील न्यायालयात सुरक्षेच्या कारणावरून काही खटल्यांची सुनावणी घेण्यात आली आहे. लॉकडाऊननंतर न्यायालये पूर्णवेळ सुरू झाल्यानंतर कारागृह न्यायालयात खटल्याची नियमित सुनावणी होणारा हा पहिलाच खटला आहे.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयyerwada jailयेरवडा जेल