शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

वडगावात गुलाल, डीजे, फटाकेमुक्त मिरवणूक

By admin | Updated: September 26, 2015 01:47 IST

येथे २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणरायाचे सातव्या दिवशी आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथातून ढोल ताशा, ढोल लेझीम व पारंपरिक

वडगाव मावळ : येथे २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणरायाचे सातव्या दिवशी आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथातून ढोल ताशा, ढोल लेझीम व पारंपरिक वाद्यांच्या निनादात उत्साहात भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. मंडळांनी शांततेत गुलाल, भंडारा, डीजे व फटाकेमुक्त मिरवणूक काढली. मिरवणुकीत युवती व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान संस्थान व जय बजरंग तालीम या मानाच्या गणरायांची मावळ पंचायत समिती चौक येथून सायंकाळी ५ वा. मिरवणूक सुरू करण्यात आली. सिद्धिविनायक, मोरया व पोलीस ठाणे या गणपतीचा समावेश होता. अग्रभागी असलेल्या मोरया ढोल पथकाचे वाद्यकाम व साहसी तलवारबाजी खेळ सादर करणाऱ्या पथकातील युवक व युवती उपस्थितांचे आकर्षण ठरले. बालविकास, जय जवान जय किसान, अष्टविनायक, जयहिंद, गणेश तरुण, आदर्श, नवचैतन्य, श्रीराम, कानिफ नाथ तरुण, साईनाथ, विजयनगर, योगेश्वर प्रतिष्ठान, पंचमुखी मारुती, इंद्रायणी, दिग्विजय, शिवशंभू हे २० गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले होते.मंडळांनी गुलाल, भंडारा, डीजे व फटाक्यांचा वापर टाळला असून, टॅ्रक्टर व ट्रकवर विद्युत रोषणाईसह आकर्षक सजावट करून रथामध्ये गणेश मूर्ती विराजमान केली.पंचशील, शिवज्योत, ओंकार, जयमल्हार ग्रुप, माळीनगर, वक्रतुंड, भैरवनाथ, श्रीमंत महादजी शिंदे, शितळादेवी मित्र मंडळासह घरगुती गणरायाचे दुपारी विसर्जन करण्यात आले.चावडी चौक येथे वडगाव-कातवी ग्रामपंचायत, वडगाव शहर भाजपा युवा मोर्चा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने, तर शिवाजी चौक येथे वडगाव शहर विकास समिती, स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान, काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, विद्यार्थी संघटनेच्या वतीने गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करण्यात आले. तहसीलदार शरद पाटील व उपअधीक्षक विनायक ढाकणे यांनीही स्वागत केले. निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर, उपनिरीक्षक आदित्य लोणीकर, पोलीस कर्मचारी व गृहसुरक्षा दलांनी शांततेत विसर्जन मिरवणूक पार पाडली. ग्रामपंचायतीने विसर्जन व्यवस्था योग्य ठेवली होती. मोठ्या गणेश मूर्तींचा आंबी येथील इंद्रायणी नदीवर विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)