शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाला गुजरातने मदत करावी; भारत देसडला यांची मागणी; नरेंद्र मोदी यांना पाठविले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 12:28 IST

घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंजाब सरकारने सर्वतोपरी साहाय्य केले होते. प्रकाशसिंग बादल यांनी या संमेलनाला राज्य सरकारचा अधिकृत दर्जा दिला होता. 

ठळक मुद्देगुजरात सरकारने पुढाकार घेतल्यास संमेलनाच्या परंपरेत नवा इतिहास : राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड या ९१ व्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष

पुणे : घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंजाब सरकारने सर्वतोपरी साहाय्य केले होते. प्रकाशसिंग बादल यांनी या संमेलनाला राज्य सरकारचा अधिकृत दर्जा दिला होता. हीच परंपरा पुढे नेत गुजरात सरकारने बडोदा येथे होत असलेल्या ९१ व्या साहित्य संमेलनाला राज्य सरकारचे अधिकृत संमेलन म्हणून सर्वतोपरी मदत करावी, अशा आशयाचे पत्र ८८ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी यांनाही पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सरहद संस्थेतर्फे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमानला पंजाब सरकारने मदतीचा हात दिला होता.  या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने बडोद्यातील संमेलनाला मदत करावी, अशी विनंती देसडला यांनी मोदी यांना केली आहे. बडोद्याला १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत सयाजीराव गायकवाड यांच्या भूमीत संमेलन होत आहे. गुजरात ही आपली कर्मभूमी असल्याने या माध्यमातून सरकारने संमेलनाला अधिकृत दर्जा देऊन मदत केल्यास गुजरात आणि महाराष्ट्रातील सबंध अधिक दृढ होतील.सयाजीराव गायकवाड यांच्या घराण्यातील राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड या ९१ व्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आहेत. त्यामुळे या संमेलनाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी गुजरात सरकारने पुढाकार घेतल्यास संमेलनाच्या परंपरेत नवा इतिहास घडू शकेल आणि घुमानप्रमाणे हे संमेलनही यशस्वी होईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

साहित्यिक कलावंत संमेलनातही मागणीसाहित्यिक कलावंत संमेलनात संजय नहार यांनीही या मुद्दा अधोरेखित केला होता. ते म्हणाले, 'बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी गुजरात सरकारने देखील उदारमतवादी धोरण ठेवले पाहिजे. महाराष्ट्राने पंजाबला नामदेव दिले, त्याचप्रमाणे मराठीभूमीने गुजरातला सयाजीराव गायकवाड दिले आहेत. कला आणि साहित्याविषयी महाराजा सयाजीराव गायकवाडांना खूप आस्था होती. पंतप्रधानदेखील गुजरातचेच असल्यामुळे आगामी संमेलनाविषयी मराठी बांधवांच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे.'

टॅग्स :Sanjay Naharसंजय नहारliteratureसाहित्यPuneपुणे