शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन योजनेसाठी तृतीयपंथीयांचा मेळावा, तहसीलदार अर्चना यादव यांनी केले मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 22:43 IST

पुणे : तृतीय पंथीयांसाठी असलेल्या पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून समपथिक ट्रस्टमध्ये तृतीय पंथीयांचा मेळावा घेण्यात आला.

पुणे : तृतीय पंथीयांसाठी असलेल्या पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून समपथिक ट्रस्टमध्ये तृतीय पंथीयांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये तहसीलदार अर्चना यादव आणि नायब तहसीलदार विलास भनावसे यांनी मार्गदर्शन केले. दारिद्र्यरेषेखालील लोकांसह गरजूंसाठीच्या सामाजिक अर्थसहाय्य योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या सूचनांनुसार मोहिम हाती घेण्यात आली आहे.बुधवार पेठेतील समपथिक ट्रस्टच्या कार्यालयामध्ये शुक्रवारी तृतीयपंथीयांसाठी मेळावा घेण्यात आला. समाजातील वंचितांसाठी असलेल्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. संजय गांधी निराधार योजना ही तृतीयपंथीयांनाही लागू असून त्यांच्यामध्ये जागरुकता आणण्याची आवश्यकता आहे. अनेकदा त्यांच्यामध्ये असलेल्या न्यूनगंडामुळे शासनदरबारी त्यांना न्याय मागताना आत्मविश्वास कमी पडतो. यावेळी यादव यांनी तृतीयपंथियांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही समजावून घेतल्या. तृतीयपंथीयांसाठी घेतले गेलेला हा पहिलाच मेळावा होता.यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बिंदूमाधव खिरे यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच या मेळाव्यामागील भूमिका समजावून सांगितली. यादव आणि भनावसे यांनी पेन्शन योजनेबाबतची सविस्तर माहिती दिली. यावेळी योजनेचा लाभ मिळावा म्हणून तृतीयपंथीयांचे अर्ज भरून घेण्यात आले. तर अनेकांना या अर्जांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रकल्प समन्वयक मिलींद पळसकर उपस्थित होते. येत्या दोन आठवड्यात अधिकाधिक तृतीयपंथीयांचे अर्ज ट्रस्टमार्फत भरून घेतले जाणार आहेत.=============राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना, घटस्फोटीत महिला पेन्शन योजना, अत्याचारीत महिला पेन्शन योजना, वेश्याव्यवसाय मुक्त महिला पेन्सन योजना, परीत्यक्ता महिला पेन्शन योजना, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्य पेन्शन योजना, अनाथ मुले-मुली योजना, तृतीयपंथी पेन्शन योजना यासोबतच दुर्धर आजारग्रस्त योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, या योजनाच ख-या लाभार्थ्यांना माहिती नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत केला जात आहे.==========आगामी काही दिवसाताच अपंगांचे मेळावे घेतले जाणार आहेत. त्या ठिकाणीच संबंधितांना अपंगत्त्वाचे प्रमाणपत्र आणि अपंग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. एक जानेवारी ते १० जानेवारी २०१८ या कालावधीत संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठका घेण्यात येणार असून वंचितांना लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे तहसीलदार अर्चना यादव यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे