शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे नियोजन करा- पालकमंत्री गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:17 IST

चालू वर्षी दुष्काळाची स्थिती भीषण असून, उपलब्ध पाण्याचे पुढील पावसाळ्यापर्यंत सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शिक्रापूर : पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याबरोबरच जनावरांचा चाराप्रश्न गंभीर बनत आहे. चालू वर्षी दुष्काळाची स्थिती भीषण असून, उपलब्ध पाण्याचे पुढील पावसाळ्यापर्यंत सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधिकाऱ्यांना दिले.शिरूर तालुक्याची दुष्काळ आढावा बैठक शिक्रापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली होती. बैठकीस विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार पोपट गावडे, सूर्यकांत पलांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सभापती मंगलदास बांदल, जि. प. सदस्या रेखा बांदल, सभापती विश्वास कोहकडे, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान शेळके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान जाधव, माजी सरपंच राम सासवडे, वाजेवाडीचे उपसरपंच अमित सोनवणे व अधिकारी बैठकीला उपस्थित होते.पाबळ, केंदूर, कान्हूरमेसाई, खैरेनगर, मिडगुलवाडी, धामारी शास्ताबाद, खैरेवाडी या गावात भीषण दुष्काळ राहणार असून या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाºयांना करण्यात आल्या. या वेळी प्रांताधिकारी भाऊ गलांडे, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी संदीप जठार, महावितरणचे नितीन महाजन, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, फॉरेस्ट अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.रब्बी हंगामाची पिके हाताला येऊन पिण्याचे पाणी गावांना मिळाले पाहिजे, अशा पद्धतीने चासकमान धरणाच्या पाण्याचे नियोजन करावे. पाणीगळती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. जनावरांसाठी चारा डेपो नियोजन करावे. आमदार वळसे पाटील यांनी अधिकाºयांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन करावे. कायमस्वरूपी पाणीटंचाई असलेल्या पश्चिम भागातील गावात टंचाई निधीतून कायमस्वरूपी खात्रीचे पाणी मिळेल अशी योजना राबवावी, अशी सूचना केली.- गिरीश बापट, पालकमंत्री

टॅग्स :girish bapatगिरीष बापटdroughtदुष्काळ