शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवाना विभागाची उत्पन्नवाढ

By admin | Updated: January 2, 2015 00:53 IST

जानेवारी महिन्यात वाढत असलेल्या रेडीरेकनरच्या दराच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने ७१४ प्रस्ताव मंजूर केले आहेत.

पुणे : जानेवारी महिन्यात वाढत असलेल्या रेडीरेकनरच्या दराच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने ७१४ प्रस्ताव मंजूर केले आहेत. यामधून पालिकेला तब्बल २२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. परिणामी महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाचे डिसेंबर महिन्यातील उत्पन्न दुप्पट झाले आहे. डिसेंबर २०१३ मध्ये पालिकेच्या बांधकाम विभागाला १०३ कोटी ४३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.एप्रिल २0१४ पासून पालिकेच्या बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांचे प्रमाण कमी झाले होते. नोव्हेंबर महिन्यापर्यंत बांधकाम विभागाला केवळ ३२४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. परंतु, डिसेंबर महिन्यात बांधकाम विभागाकडे परवानगीसाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल झाल्याने उत्पन्नात अचानक वाढ झाली. त्यामुळे एका महिन्यातच पालिकेने २२५ कोटी रुपये मिळविले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये बांधकाम क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे बांधकाम परवान्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. परिणामी प्रशासनाने ठेवलेले उद्दिष्ट गाठण्याचे मोठे आव्हान होते. मात्र डिसेंबर महिन्यात प्रशासनाने मोठी भरारी घेत ठेवलेले उद्दिष्ट साध्य करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.एप्रिल २०१५ पर्यंत बांधकाम परवाना विभागाने ९०५ कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक असलेले ३५० कोटी रुपये मिळविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. बांधकाम विभागाने २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी ८०४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ६५७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट प्रशासनाने गाठले होते. २०१४-१५ या वषार्साठी प्रशासनाने ठेवलेले संपूर्ण उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)उत्पन्नाची आकडेवारी महिनामंजूर मिळालेले उत्पन्नप्रस्तावएप्रिल३०२३८ कोटी १७ लाख मे३०३३० कोटी ३६ लाखजून३७६४६ कोटी ५९ लाखजुलै३५६३९ कोटी ५४ लाखआॅगस्ट ३२५४३ कोटी ३२ लाखसप्टेंबर३१५४० कोटी ३० लाखआॅक्टोबर३०६३९ कोटी ७४ लाखनोव्हेंबर३१८४६ कोटी ३७ लाखडिसेंबर७१४२२५ कोटी ४ लाखकोरेगाव पार्क, प्रभात रस्ता महागडेच ४नोंदणी व मुद्रांक विभागाने शहरात रेडीरेकनरच्या दरात सरासरी १४ टक्के वाढ केली असून, त्यानुसार यंदाही कोरेगाव पार्क परिसर शहरातील सर्वांत महागडे ठिकाण ठरले आहे. येथील दर प्रतिचौरस फुटांसाठी १२,९६० रुपये आहेत, तर पाठोपाठ प्रभात रस्त्याचा दर ११,८९२ रुपये इतका झाला आहे.४राज्यात खरेदी-विक्री व्यवहारांसाठी नवे वार्षिक बाजार मूल्यतक्ते (रेडी रेकनर) १ जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत. ही वाढ करताना, या परिसरांत गेल्या वर्षभर झालेले खरेदी-विक्री व्यवहार, परिसराची संभाव्य वाढ, विकसन क्षमता याचा आधार घेण्यात आला. त्यानुसार घोरपडीमधील कोरेगाव पार्क परिसर हा सर्वात महागडा ठरला आहे. कोरेगाव पार्कमध्ये गतवर्षी सदनिकांचा दर ११,२३१ रुपये प्रतिचौरस फूट होता. यंदा हा दर १२,९१६ रुपयांवर गेला आहे. म्हणजेच त्यात प्रतिचौरस फूट १,६८५ रुपयांनी वाढ झाली आहे. कोरेगाव पार्कमधील सर्व्हे क्रमांक १ ते १७ व लगतचा रेडीरेकनरचा दर चौरस फुटाला १२,४३५ रुपये आहे. ४डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्यावरील सदनिकांच्या दरातही मोठी वाढ होणार नाही. या रस्त्यावरील रेडीरेकनरच्या दरात वीस टक्के वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १४, १५, लॉ कॉलेज रस्ता, कांचन गल्ली, डॉ. केतकर रस्ता, प्राप्तिकर इमारत रस्ता, अशोक पथ, भांडारकर संस्था या परिसराचा रेडीरेकनर दर ११,८९२ वर गेला आहे. तसेच बाणेर रस्ता ९,०१६, अभिमान श्री ९,७२९, डहाणूकर कॉलनी ८,७५६, पद्मावती ८,७९८, शनिपार ९,१७३, ढोले-पाटील रस्ता ९,५५८, गांजवे चौक ९,०५६, लक्ष्मी रस्ता ८,४६७, केळकर रस्ता ६,५५९ व वारजे येथील दर ५,९०० रुपये प्रतिचौरस फूट झाला आहे.