शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

सोयाबीनमुळे भुईमुगाचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:24 IST

नगदी पिकांकडे लक्ष; रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे बसला फटका

ओझर : जुन्नर तालुक्यात खरीप हंगामात या वर्षी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून, सोयाबीनच्या तुलनेत भुईमूग पिकाची पेरणीत निम्मयाने घट झाली आहे.सोयाबीन व भुईमुग या पिकांकडे शेतकरी वर्ग नगदी पीक म्हणून पाहत आहे. दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरीपणामुळे व जमिनीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीतील भुईमूग पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक घटकांच्या विनाशामुळे या पिकाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होत आहे.जुन्नर तालुक्यात या वर्षी सोयाबीन पिकाची ६ हजार ७०० हेक्टरवर तर भुईमुग पिकाची ३ हजार ५०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबिन पिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये खर्च येतो. तर हेक्टरी २५ मेट्रिक टन उत्पादन मिळत असल्याचे तालुका कृषि अधिकारी हिरामन शेवाळे व जुन्नर तालुका कार्यालयीन कृषी अधिकारी बापू रोकडे यांनी सांगितले.सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी या हंगामत तालुका कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव मंडल विभागात शेतकरी गटा मार्फत केडीएस ३४४ या वाणाची प्रतेकी १० हेक्टरवर ८ प्रकल्पात नारायणगांव, पिंपळवंडी, कुरण, ओझर, धालेवाडी तर्फे हवेली, खोडद, वडगाव कांदळी गावातील शेतकºयांना सोयाबीन बी पुरविन्यात आले असून त्यांची पेरणी बीबीएफ (रुंद सरी वरुंभा) पद्धतीने करण्यात आली आहे.३४ गावांमधे सोयाबीन पिकावर एकात्मिक किड व्यावस्थापनांतर्गत पक्षी थांबे, फेरोमन सापळे लावण्यात आले आहेत. या प्रकल्पास महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक व अधिकारी यांनी भेट देवून उत्पादन वाढीच्या उपक्रमबाबत समाधान व्यक्त केले. प्रकल्पातील प्रात्यक्षिक व माइक्रो निरीक्षण नोंदणीसाठी कृषि पर्यवेक्षक रामचंद्र गाडेकर, घनश्याम भादेकर, तान्हाजी भुजबळ, मालती गायकवाड, सुजाता पंधे, मनीषा ठोंबरे, पुष्पलता वाबळे, आशा सहारे, पी. जी. अडगळे यांनी किड रोगाविषयी मार्गदर्शन केले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे