शिवजयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांनी प्रवासी व नागरिकांना पेढे वाटप केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचा पराक्रम सर्वसामान्य रयतेसाठी होता. कर्मचाऱ्यांनीही याचप्रमाणे आपल्या कर्तव्याप्रती जागरूकता ठेवून चारित्र्यसंपन्न राहावे, असे रमेश हांडे म्हणाले.
याप्रसंगी महिला प्रवाशांनी शिवजन्माचा पाळणा गायन केला तर ॲड. गाडगे यांनी शिवाजी महाराजांविषयी मनोगत व्यक्त केले. बसस्थानकावर रांगोळी कलाकार संतोष यांनी आकर्षक रांगोळी रेखाटली होती, तर बाल शिवाजींची वेशभूषा केलेला रुद्र चिखले हा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. सूत्रसंचालन दिलीप चौधरी यांनी केले.
या वेळी स्थानकप्रमुख तुकाराम पवळे, माणिक थिगळे, दत्ता गभाले, वाहतूक नियंत्रक दिलीप तापकीर, एम. डी. शिंदे, विष्णू राठोड, तसेच दिलीप चौधरी, रमेश तापकीर, अमित जगताप, भारत वाबळे, नीलेश सातकर, कालिदास चिखले, स्नेहा कातोरे, महादेव तुळसे, देवराम रणपिसे, सुरेश पाचारणे आदी उपस्थित होते.
१९राजगुरुरनगर रांगोळी
शिवजयंतीनिमित्त बसस्थानकावर रांगोळी आकर्षक रांगोळी रेखाटली होती.