वारजेत ठिकठिकाणी महामानवास अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:54+5:302021-04-15T04:10:54+5:30

मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता जकात नाका परिसरात स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मेणबत्त्या पेटवून अभिवादन ...

Greetings to the people at Warje | वारजेत ठिकठिकाणी महामानवास अभिवादन

वारजेत ठिकठिकाणी महामानवास अभिवादन

Next

मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता जकात नाका परिसरात स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मेणबत्त्या पेटवून अभिवादन केले. यावेळी स्वीकृत सभासद दत्तात्रय चौधरी, तेजस इंगळे, अभिषेक गोडांबे, किशोर म्हस्के, मिलिंद म्हस्के तसेच चिदानंद प्रतिष्ठान सभासद व विशालदत्त मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

रामनगर येथील माता रमाई महिला मंडळ, डोंगरवाडी व सिध्दार्थ चौक येथे देखील मंडळांच्या सदस्यांनी साधेपणा जपत महामानवास अभिवादन केले. या वेळी नगरसेविका सायली वांजळे शिंदे, माजी जि.प. सदस्य प्रभाकर भोरकडे, मयुरेश वांजळे, भावना पाटील, पुष्पा कदम, चांदवीलकर, रवी वांजळे आदी मान्यवर उपस्थित होते.

येथील आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते नीलेश आगळे म्हणाले की कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने सर्वांना घरीच जयंती साजरी करण्याबाबाबत आवाहन केले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

राहुल मित्र मंडळ, शिवणे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी बुद्धविहारात बुद्धवंदना घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ग्रामपंचायत सदस्य संतोष कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राकेश कदम, अशोक भोसले, गौरव कदम, बापु सोनवणे उपस्थित होते.

फोटो ओळ:- रामनगर येथे महामानवास अभिवादन करताना सायली वांजळे, प्रभाकर भोरकडे व माता रमाई महिला मंडळाच्या कार्यकर्त्या.

Web Title: Greetings to the people at Warje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.