शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

किल्ले नारायणगड येथे हरित शिवजयंती उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:19 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त स्वराज्याचे वैभव असलेल्या प्रत्येक गडावर ३९१ झाडे लावण्याचा संकल्प अभिनेते व वृक्षप्रेमी ...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त स्वराज्याचे वैभव असलेल्या प्रत्येक गडावर ३९१ झाडे लावण्याचा संकल्प अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे आणि शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रेरणेतून खोडदजवळील किल्ले नारायणगडाच्या पायथ्याशी पार पडला.

सध्या पर्यावरणात होत चाललेला बदल आणि जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे आणि म्हणून पिंपरी- चिंचवड येथील भूगोल फाऊंडेशन, संतनगर मित्रमंडळ, मोशी प्राधिकरण यांनी खोडद व हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामस्थ व तरुणांच्या सहकार्याने सुरुवातीला खोडद गावामध्ये स्वच्छता करून वसुंधरा वाचविण्यासाठी पर्यावरणाचे महत्व पटवून दिले.

पर्यावरणविषयीचे विविध फलक हातात घेऊन व संदेश-घोषणा देत पर्यावरण जनप्रबोधनफेरी काढण्यात आली व त्यानंतर किल्ले नारायणगडाच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले.

खऱ्या अर्थाने भगव्या मशाली बरोबर हिरव्या मशाली पेटवून वसुंधरा हिरवीगार करण्यासाठी झाडे लावून हा कार्यक्रम पार पाडून एक आगळी वेगळी हरित शिवजयंती साजरी करण्यात आली. सृजनशील भारतीय नागरिक म्हणून ह्या मोहिमेतील एक घटक बनून आपला भारत व आपली भूमाता वसुंधरा प्रदूषणमुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जतन करण्यासाठी शिवप्रेमी , पर्यावरणप्रेमी व तरुण मुले आणि महिला सहभागी झाले होते.

या वेळी भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज, तानाजी अरबूज, शशिकांत वाडते, साहेबराव गावडे, अशोक वाडेकर, विठ्ठल लंघे, सुभाष इचके,सचिन घेनंद, दत्तात्रय शिंदे, विमल शेळके, शीलाताई इचके, शोभाताई फटांगडे,अपूर्वा वाळुंज, सविता ममदापुरे,सविता देशिंगे,प्रतीक्षा ममदापुरे, प्रतीक ममदापुरे, सुदर्शन फटांगडे, पियुष फटांगडे,स्वप्नल देशिंगे,नचिकेत शेळके यांनी सहभाग घेतला.

यावेळी भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज यांनी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या कामाची माहिती देऊन पर्यावरण रक्षणासाठी झाडांचे महत्त्व पटवून दिले.यावेळी जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, दीपक सोनवणे,नलावडे उपस्थित होते.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. मुक्ताई वंचित आधार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शरद पोखरकर, माजी सरपंच जालिंदर डोंगरे मामा यांची भाषणे झाली.या कार्यक्रमाला खोडदच्या उपसरपंच सविता गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य रवी मुळे,योगेश शिंदे,गणपत वाळुंज, संदीप घायतडके,सामाजिक कार्यकर्ते अमोल काळे,सुरेश काळे ,शिवदास खोकराळे, पोलीस पाटील सुहास थोरात, अंबिका पतसंस्थेचे संचालक प्रकाश गायकवाड,वृक्षमित्र जालिंदर कोरडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

भूगोल फाउंडेशनच्या वतीने किल्ले नारायणगडाच्या पायथ्याशी शिवजयंती निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.