शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन कॉरिडॉरमुळे तिघांना जीवदान : पुण्यातील तरुणाचे यकृत प्रत्यारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 21:48 IST

सोलापूर येथील एका ५३ वर्षीय रूग्णाला डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर खाजगी रूग्णालयात मेंदूमृत घोषित करण्यात आले. या रूग्णाचे यकृत व मुत्रपिंड दान केल्याने तीन व्यक्तींना जीवदान मिळाले आहे.

ठळक मुद्देसोलापूरहून दोन तास ५० मिनिटांत प्रवास अवयवाच्या प्रत्यारोपणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी बाब

पुणे : लिव्हर सिरॉसिसने ग्रस्त असलेल्या पुण्यातील ३८ वर्षीय रूग्णावर मंगळवारी यशस्वीरित्या यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. सोलापूर येथील एका ५३ वर्षीय रूग्णाला डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर खाजगी रूग्णालयात मेंदूमृत घोषित करण्यात आले. या रूग्णाचे यकृत व मुत्रपिंड दान केल्याने तीन व्यक्तींना जीवदान मिळाले आहे. मुत्रपिंड अन्य रूग्णालयास देण्यात आले,तर यकृत सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रस्ता येथे आणण्यात आले.डॉ.दिनेश झिरपे म्हणाले, ‘सोलापूर येथील ५३ वर्षीय व मेंदूमृत घोषित केलेल्या रूग्णाविषयी आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर ताबडतोब आमची टीम सोलापूरला पोहोचली व त्यांनी हे यकृत पुण्यात आणले. सर्वसामान्यपणे सोलापूर ते पुणे प्रवासासाठी ५ तास लागतात. मात्र, ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून हे यकृत २ तास ५० मिनिटे इतक्या कमी वेळात पुण्यात आणण्यात आले.’डॉ. बिपीन विभुते म्हणाले, ‘आमची टीम दुपारी १२ वाजता निघाली व पुण्यात २ वाजून ५० मिनिटांनी पोहोचली. त्यानंतर, पुण्यातील रूग्णावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. या रूग्ण शेवटच्या टप्प्यातील लिव्हर सिरॉसिसने ग्रस्त होता.’डॉ.बिपीन विभूते, डॉ दिनेश झिरपे, डॉ. अनिरुद्ध भोसले, भलतज्ञ डॉ मनीष पाठक,डॉ मनोज राऊत, क्लीनिशिअन डॉ अभिजीत माने, प्रत्यारोपण समन्वयक राहुल तांबे व अरुण अशोकन, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता नितीन दुषिंग यांनी या प्रत्यारोपणामध्ये महत्वाची भूमिका बजावली.डॉ.केतन आपटे म्हणाले, ‘अवयवाच्या प्रत्यारोपणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी बाब आहे. परंतु, अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयदाते यांच्या संख्येत अजूनही प्रचंड तफावत आहे. ही दरी भरून काढायची असेल तर अवयवदान किमान २० पटीने वाढणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे.’

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर