शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत हिचे पुण्यात जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 21:33 IST

भारतमाता की जय, जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम् या घोषणांनी रविवारी पुणे येथील आंतरराष्ट्रीय  विमानतळावर सुवर्ण व रौप्यपदकविजेत्या नेमबाज तेजस्विनी सावंतचे जल्लोषात स्वागत झाले. 

पुणे :ती आली,  तिने पहिले आणि तिने जिंकले अशी स्थिती पुण्यात रविवारी झालेली बघायला मिळाली. भारतमाता की जय, जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम् या घोषणांनी रविवारी पुणे येथील आंतरराष्ट्रीय  विमानतळावर सुवर्ण व रौप्यपदकविजेत्या नेमबाज तेजस्विनी सावंतचे जल्लोषात स्वागत झाले. यावेळी तिची एक झलक टिपण्यासाठी शेकडो कॅमेरे लखलखत होते. घरच्यांचा व सहकाऱ्यांचा  पाठिंबा  आणि सरावादरम्यान केलेले योग्य नियोजन यामुळे गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल  स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकू शकले, असे ‘गोल्डन गर्ल’ तेजस्विनीने सांगितले. या घोषणा सुरू असतानाच तिचे आगमन झाल्यावर तिने वरील व्यक्तव्य केले. तेजस्विनी म्हणाली, सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असल्यामुळे मी ही दोन पदके जिंकण्याची कामगिरी करू शकले. सुरुवातीला मनात जरा हुरहूर होती; कारण बऱ्याच  वर्षांनी मी मोठ्या स्पर्धेत सहभागी होत होते. पण एकदा स्पर्धा सुरू झाली आणि मनावरचे दडपण नाहीसे झाले. कारण जिद्द होती पदक जिंकण्याची. या स्पर्धेच्या तयारीदरम्यान माझे पती व सासूबाई  यांच्यासह घरातील सर्व मंडळी आणि क्रीडा क्षेत्रातील सर्व सहकाऱ्यांच्या  सहकार्यामुळे हे यश संपादन करू शकले. उदयोन्मुख खेळाडूंना काय सांगशील, असे विचारल्यावर तेजस्विनी म्हणाली, ‘‘त्यांनी आपले गुरू आणि आई-वडिलांवर डोळे झाकून विश्वास ठेवावा; कारण ते आपले कधीच वाईट इच्छित नाहीत. ते जे काही मार्गदर्शन करतात ते आपल्या चांगल्यासाठीच असते.’’  विमानतळावर तिच्या स्वागतासाठी  तेजस्विनीचे पती समीर दरेकर, आई सुनीता  सावंत, बहीण अनुराधा पित्रे, राज्याचे सहसंचालक नरेंद्र सोपल, सहायक संचालक सुधीर मोरे, माजी ज्युनिअर जागतिक नेमबाज विजेता नवनाथ फडतरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :PuneपुणेCommonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८