शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सुप्याच्या प्रारुप विकास आराखड्याला ग्रामसभेत विरोध; ग्रामसभेचा विरोधी ठराव सर्वानुमते मंजुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 22:19 IST

मार्च २०२५ मध्ये शासनाच्यावतीने तो आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती सरपंच तुषार हिरवे आणि ग्रामविकास अधिकारी महेंद्र बेंगारे यांनी दिली. 

सुपे दि. २४ ( वार्ताहर )- बारामती तालुक्यातील सुपे येथील प्रसिद्ध झालेल्या प्रारुप विकास आराखड्याला ( डीपी प्लॅन ) सोमवारी ( दि. २४ ) घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेमध्ये विरोध करण्यात आला. येथील सरपंच तुषार हिरवे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २६ जानेवारी २०२० मध्ये झालेल्या ग्रामसभेमध्ये सुप्याचा प्रारुप विकास आराखडा करण्यात यावा, याबाबतचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार मार्च २०२५ मध्ये शासनाच्यावतीने तो आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती सरपंच तुषार हिरवे आणि ग्रामविकास अधिकारी महेंद्र बेंगारे यांनी दिली.  यावेळी ग्रामस्थांच्यावतीने माजी सभापती दिलीप खैरे, ॲड. चंद्रशेखर जगताप, विलास धेंडे यांनी प्रारुप विकास आराखड्याविषयी चर्चा केली. सुप्याच्या सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्राविषयी बोलताना जगताप म्हणाले की, येथील सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र हे अभयारण्यासाठी संरक्षित आहे. तर राहिलेल्या क्षेत्रात शेतकरी आपली उपजिविका करीत आहे. त्यापैकी ५० ते ६० हेक्टर क्षेत्र गावठाण आहे. येथील मागिल दहा वर्षाची लोकसंख्या विचारत घेता प्रतिवर्षी दिड ते दोन टक्याने सुप्याची लोकसंख्या वाढत आहे. सद्या येथे सुमारे ५ हजार मतदार तर राहिलेल्या आठरावर्षाखाली दिड हजार मिळुन साडेसहा हजार लोकसंख्या होत आहे. त्यामुळे ऐवढ्या कमी लोकसंख्येला सुप्याला डिपी प्लॅन नको आहे.  या डिपी प्लॅनमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरावर तसेच शेतीवर नांगर फिरत असेल तसेच काही भुमिहीन होणार असतील तर हा डिपी प्लॅन राबवुन गावाला कोणताही उपयोग नसल्याने त्यास विरोध म्हणुन उपस्थित ग्रामस्थांनी हात वर करुन ग्रामसभेत निर्णय घेतला. यावेळी माजी सभापती दिलीप खैरे म्हणाले की, येथील डीपी प्लॅन बनवताना गोरगरीबांच्या जागेवर आकस ठेवुन आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी माहिती नसताना त्यांच्या एका पदाधिकाऱ्याने हा डीपी प्लॅन बनवुन सर्वसामान्याचे हाल केले आहेत. त्यामुळे हा डीपी प्लॅन रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विलास धेंडे यांनी ग्रामसभेला हा डीपी प्लॅन रद्द करण्याचा अधिकार आहे का? याबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे विचारणा करुन हा प्लॅन रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान येथील प्रारुप विकास आराखड्यास ग्रामसभेत सर्वानुमते विरोध असल्याचा ठराव करण्यात आल्याची माहिती सरपंच तुषार हिरवे यांनी दिली.