शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

ग्रामसभेतच मागितली दारू परवान्यासाठी ‘ना हरकत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:53 IST

अनेक गावांमध्ये बाटली आडवी करून दारूबंदीचा ठराव होत असतानाच जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य अशा वारूळवाडी ग्रामपंचायतीमध्ये महिलांची ग्रामसभा दि़ १४ आॅगस्ट २०१७ रोजी आयोजित

नारायणगाव : अनेक गावांमध्ये बाटली आडवी करून दारूबंदीचा ठराव होत असतानाच जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य अशा वारूळवाडी ग्रामपंचायतीमध्ये महिलांची ग्रामसभा दि़ १४ आॅगस्ट २०१७ रोजी आयोजित करून, या ग्रामसभेमध्ये परमिट रूम व बिअरबार यांना ना हरकत द्यावा, असा विषय ठेवण्यात आला आहे. या विषयी ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव दि़ ११ मे २०१७ मध्ये करण्यात आला़ विशेष म्हणजे, ज्यांनी विषय मांडला, ज्या व्यक्तीने अनुमोदन दिले़, त्यांनीच दारू परवान्याकरिता ना हरकत मागितल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. ना हरकत मिळावा म्हणून अर्ज करणाºयांमध्ये एक माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे़ वारूळवाडी ग्रामपंचायतची ग्रामसभा दि़ ११ मे २०१७ रोजी वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेण्यात आली होती़ त्यावेळी विषय क्ऱ ८ व ठराव क्ऱ ८ नुसार ऐनवेळच्या विषयांमध्ये वारूळवाडी शहरात संपूर्ण दारूबंदीचा ठराव मांडण्यात आला. संपूर्ण गावात दारूबंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला़ या ठरावाला अनुमोदन माजी पंचायत समिती सदस्यांनी दिले. यानंतर पाच जणांनी ग्रामपंचायतीकडे परमिटरूम व बिअरबारसाठी ग्रामसभेची मान्यता व ग्रामपंचायतीचा नाहरकत मिळावा, असा अर्ज केला़अर्ज करणाºयांमध्ये दारूबंदीचा ठराव करणारे सुचक तसेच व अनुमोदक देणारा माजी पंचायत समिती सदस्य यांनीदेखील अर्ज केला़ त्यानंतर एका माजी जिल्हा परिषद सदस्याने देखील बिअर बार परवान्यासाठी नाहरकतची मागणी केली़ दि़ १५ आॅगस्ट २०१७ रोजी शासन निर्णयानुसार विशेष ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे़ या स्वातंत्र्य दिनानिमित्त दारू परवान्याचा विषय नको म्हणून महिलांची ग्रामसभा दि़ १४ आॅगस्ट २०१७ रोजी घेऊन विषय पत्रिकेमधील विषय क्ऱ ३ नुसार मद्यविक्री व्यवसाय परवानगी मागणीबाबत आलेल्या अर्जांचा विचार करणे हा विषय ठेवण्यात आला आहे़ दारूबंदीचा ठराव होऊनदेखील पुन्हा नव्याने दारू परवान्यासाठी अर्ज मागणी आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते़ वारूळवाडी शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून संबोधले जाते़ या ठिकाणी सुमारे ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ मराठी माध्यम, इंग्लिश मीडियम, कृषी विज्ञान केंद्र, महाविद्यालय, बी़ एड्, बी.एस्सी, व्यवसायिक प्रशिक्षण, आय़टी़आय, नर्सरी पासून ते १२ वी व त्यानंतर उच्चशिक्षणाची सुविधा याठिकाणी आहे़ विविध शैक्षणिक सुविधा याठिकाणी असल्याने वारूळवाडी गावचा मोठा विस्तार झालेला आहे़ या गावाची सन २००२ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १२ हजार २००,असली तरी प्रत्यक्षात २० हजारहून अधिक लोकसंख्या आहे़ तसेच वारूळवाडी ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची आहे. वारूळवाडीचे उपसरपंच जंगल कोल्हे यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दि़ १५ आॅगस्ट २०१७ पूर्वी महिलांची ग्रामसभा घेणे आवश्यक असल्याने दि़ १४ आॅगस्ट २०१७ ग्रामसभा आयोजित केली आहे़पाच ग्रामस्थांनी परमिट रूम व बिअर बार करीता ना हरकत मागणी केली आहे़ त्यामुळे हा विषय पत्रिकेवर घेण्यात आला आहे़ सभेच्या सुचनापत्रा मध्ये दि़ १५ आॅगस्ट लिहीली असली तरी ती सभा दि. १४ आॅगस्ट रोजीच घेण्यात येणार आहे़.व्यसनाधिनतेकडे देणारे पाऊलग्रामपंचायतीला १ कोटीहून अधिक महसूल आहे़ वारूळवाडी ग्रामपंचायतीचे उतारे स्वतंत्र झाले आहेत. असे असताना पाच ठिकाणी दारू परवान्याकरिता अर्ज आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़वारूळवाडी शहरातील ठाकरवाडी रोडवर परमिट रूम व बिअरबार परवान्यासाठी ३ अर्ज, मांजरवाडी रोडवर १ अर्ज व गुरुकुल रोडवर १ अर्ज, असे पाच अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल झालेआहेत़ या अर्जदारांना नाहरकतमिळावी, यासाठी दि़ १४ आॅगस्ट २०१७ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे़विद्येच्या माहेरघरात दारूबंदी होण्याऐवजी दारू व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्यानेहे शहर तरुणांना व्यसनाधिनतेकडेघेऊन जात आहे की काय, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे़अनेक गावांमध्ये महिला दारूबंदी करून आदर्श निर्माण करत असतानाच वारूळवाडी शहर दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्याचा घाट घालत असल्याने याबाबत शहराचा आदर्श लोकांनी काय घ्यावा, असा प्रश्न नागरिकांमध्ये सुरू आहे़ येत्या दि़ १४ आॅगस्टला ठराव मंजूर होणार किंवा नाही, याकडे नारायणगावसह पंचक्रोशीतील गावांचे लक्ष लागले आहे़