शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दस्तनोंदणी करतानाच ग्रामपंचायतीचा प्रॉपर्टी टॅक्स नावावर, नोंदणी विभागाचा उपक्रम, नागरिकांचे हेलपाटे वाचणार

By नितीन चौधरी | Updated: June 11, 2025 08:43 IST

मिळकत पत्रावरील युनिक आयडी क्रमांकावरून थेट तुमचे नाव ग्रामपंचायतीच्या दप्तरी लावण्यात येणार आहे.

पुणे : ग्रामपंचायत हद्दीत दस्त नोंदणी केलेल्या नव्या व जुन्या मालमत्तेवरील कर व पाणीपट्टी थेट खरेदीदाराच्या नावावर करण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बुधवारपासून (दि. ११) उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील सर्व २७ हजार ९५१ ग्रामपंचायतींमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मिळकत कर नावावर करण्यासाठी आता हेलपाटे मारण्याची गरज नाही. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून ही सुविधा आता दस्त नोंदणीवेळीच उपलब्ध करून देण्यात येत आहे. मिळकत पत्रावरील युनिक आयडी क्रमांकावरून थेट तुमचे नाव ग्रामपंचायतीच्या दप्तरी लावण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील कोणतेही नवे किंवा जुने घर खरेदी केल्यानंतर त्यावरील मालमत्ता कर, पाणीपट्टी बिल आपल्याला स्वत:च्या नावावर करण्यासाठी ग्रामपंचायतीत स्वतंत्र अर्ज द्यावा लागतो. त्यासाठी वेळेची मर्यादा नसल्याने सरकारी पद्धतीने तुम्हाला हेलपाटे मारावे लागतात.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आता दस्तनोंदणी करतानाच ‘आय सरिता’ या प्रणालीचे एकत्रीकरण केले आहे. दस्तनोंदणी झाल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही माहिती ग्रामपंचायतीला ऑनलाइन दिल्यानंतर त्यांच्याकडील प्रणालीद्वारे खरेदी केलेली मालमत्ता थेट नावावर नोंदली जाईल. यात खरेदीदार आणि विक्री करणारा, खरेदीची किंमत आणि मालकी हक्क बदलाची सर्व माहिती ग्रामपंचायतीला कळविण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रामपंचायत संबंधिताला कराची नोटीस बजावेल. जेणेकरून ग्रामपंचायतीचा कर संबंधिताच्या नावावर दिसू लागेल. जुन्या मिळकतवरील कराची थकबाकी असल्यावर ग्रामपंचायती संबंधिताला नोटीस बजावून ती वसूल करू शकेल.

राज्यातील सर्व ३५९ नगरपालिकांची यंत्रणा आयडब्ल्यूबीपी या यंत्रणेशी संलग्न करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नगरपालिका आणि पंचायती नोंदणी विभागाशी जोडण्यात आल्यानंतर ही प्रणाली वर्षभरापूर्वी सर्व ठिकाणी एकाच वेळी लागू झाली आहे. याच पद्धतीने ग्रामपंचायतींमध्येही ही प्रणाली लागू झाली आहे. अपवाद मात्र महापालिकांचा आहे.

प्रत्येक महापालिकेची यंत्रणा वेगवेगळी आहे. त्यामुळे आतापर्यंत या प्रणालीत १७ महापालिकांमध्ये लागू करण्यात आली आहे. अन्य महापालिकांमध्ये ही यंत्रणा लागू करण्यासाठी त्यांच्याकडील एपीआय किट उपलब्ध झाल्यानंतर तेथेही लागू करण्यात येईल, अशी माहिती उपनोंदणी महानिरीक्षक अभयसिंह मोहिते यांनी दिली.

‘आय सरिता’चे एकत्रीकरण केल्यानंतर राज्यातील प्रमुख १७ महापालिका व ३५९ नगरपालिकांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. आता २७ हजार ९५१ ग्रामपंचायतींमध्येही ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. नांदेड-वाघाळा महापालिकेत ही सुविधा येत्या दोन ते तीन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. - अभयसिंह मोहिते, उपनोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक शुल्क विभाग, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड