शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 09:38 IST

 मतदान  21 डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राहील. मतमोजणी 22 डिसेंबर (बुधवार) रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्या ठिकाणी व वेळेनुसार होईल

पुणे: राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.  नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये 22 नोव्हेंबर 2021 (सोमवार)  पर्यंत सुधारणा करण्यात येईल. तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक 22 नोव्हेंबर 2021 (सोमवार) आहे. 

उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 30 नोव्हेंबर (मंगळवार) ते 6 डिसेंबर (सोमवार) या कालावधीत आणि  सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या वेळेत सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 7 डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होईल आणि छाननी संपेपर्यंत ही प्रक्रीया चालेल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम  दिनांक 9 डिसेंबर (गुरुवार) असून वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

 मतदान  21 डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राहील. मतमोजणी 22 डिसेंबर (बुधवार) रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्या ठिकाणी व वेळेनुसार होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 27 डिसेंबर 2021 (सोमवार) पर्यंत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात  वेल्हे तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींमधील 65 जागा, भोर 71 ग्रामपंचायती 121 जागा, पुरंदर 16 ग्रा.पं.-27 जागा, दौंड 6 ग्रा.पं.-6 जागा, बारामती 10 ग्रा.पं.-13 जागा, इंदापूर 6 ग्रा.पं.-8 जागा, जुन्नर 31 ग्रा.पं.-55 जागा, आंबेगाव 33 ग्रा.पं.-55 जागा, खेड 36 ग्रा.पं.-49 जागा, शिरुर 8 ग्रा.पं.-12 जागा, मावळ 15 ग्रा.पं.-19 जागा, मुळशी 35 ग्रा.पं.च्या 63 जागांसाठी तर हवेली तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या 10 जागा अशा एकूण 317 ग्रामंपचायतीतील 503 जागांसाठी पोट निवडणूक होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVotingमतदान