शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

ग्रामपंचायती होणार ‘आॅनलाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 02:46 IST

मुळशी तालुक्यामधील अतिदुर्गम असलेला मोसेखोरे हा भाग अद्याप ही अनेक मूलभूत व गरजू सुविधांपासून वंचित असताना आता या भागांमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी बीएसएनएलकडून केबल टाकण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आल्याने मोसे खो-यातील मौजे तव व मोसे खुर्द या दोन गावांमधील ग्रामपंचायती आता पहिल्यांदाच आॅनलाइन होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपिरंगुट : मुळशी तालुक्यामधील अतिदुर्गम असलेला मोसेखोरे हा भाग अद्याप ही अनेक मूलभूत व गरजू सुविधांपासून वंचित असताना आता या भागांमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी बीएसएनएलकडून केबल टाकण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आल्याने मोसे खो-यातील मौजे तव व मोसे खुर्द या दोन गावांमधील ग्रामपंचायती आता पहिल्यांदाच आॅनलाइन होणार आहेत.वरसगाव धरणाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या या अतिदुर्गम भागाच्या खोºयामध्ये अनेक भौगोलिक समस्यांमुळे इंटरनेटची केबल टाकता येणार नसल्याचे कारण पुढे करीत आॅनलाइन सुविधेमधून मौजे तव व मोसे खोरे ही गावे वगळण्यात आली होती. परंतु ह्या गावांना आॅनलाइन सुविधा मिळवून देण्यासाठी तवच्या सरपंच पल्लवी लालासो पासलकर, लालासाहेब पासलकर व रवींद्र पासलकर यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधून त्याच्याशी पत्रव्यवहार केला. माऊली मरगळे, दिलीप पासलकर, लालू ठिकडे, महादू मरगळे, बबन पासलकर, ज्ञानेश्वर ठिगळे, शशिकांत पासलकर व विठ्ठल पासलकर या सर्वांचे नेहमीच सहकार्य लाभले. यानंतर याठिकाणी तातडीने काम सुरू करण्यात आलेले आहे.आता पानशेत ते तव या रस्त्याचे नुकतेच भूमिपूजन हे काही दिवसांपूर्वीच झालेले आहे. त्यामुळे आता मोसे खोºयातील गावे पुणे व कोकणाला जोडली जाणार आहेत. त्यामुळे या भागांचा संपर्क वाढणार असून येथील नागरिकांच्या विकासाला चालना मिळणार आहे.मूलभूत सुविधाही नाहीतमुळशी तालुक्यामध्ये असलेला मोसे खोरे हा भाग देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास सत्तर वषार्पेक्षा जास्त कालावधी झाला असताना सुद्धा अद्याप ही अनेक मूलभूत सुविधा पासून वंचित आहे.या बाबतचे वृत्त हे ‘लोकमत’ने वारंवार दिलेले होते. त्यातच या भागामध्ये आता नुकतीच कुठे वीज मिळालेली आहे. तर काही महिन्यांपूर्वी स्वातंत्र्या नंतर प्रथमच ग्रामसचिवालय मिळालेले आहे तर काही गावांमध्ये आताशी कुठे कच्चे रस्ते मिळालेले आहेत. तर या भागामध्ये दळणवळणाची खूपच मोठीच समस्या असल्याने या भागाचा जगाशी खूपच कमी प्रमाणात संपर्क आहे यावरून या भागाचे वास्तव्य समोर येत. 

टॅग्स :Puneपुणे