शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सरकार... तक्रार करायची कुठे? ‘आमची मुलगी’ वेबसाइट चार वर्षांपासून बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 08:44 IST

ही वेबसाइट चार वर्षांपासून बंदच असून, ती सुरू हाेण्याची शक्यताही मावळल्याने गर्भातच कळ्या खुडण्यासाठी माेकळे रान झाल्याचे दिसून येत आहे.

- ज्ञानेश्वर भाेंडे

पुणे : प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने ‘आमची मुलगी’ ही वेबसाइट तयार केली. यावर लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्राची, डाॅक्टरांची तक्रार करता येते; परंतु, ही वेबसाइट चार वर्षांपासून बंदच असून, ती सुरू हाेण्याची शक्यताही मावळल्याने गर्भातच कळ्या खुडण्यासाठी माेकळे रान झाल्याचे दिसून येत आहे.

अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या गर्भपाताविरोधात कोणाला तक्रार करावयाची असेल‎ किंवा काही माहिती हवी असेल, तर ती www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध हाेत असे. प्रजनन आणि माता आरोग्य सुधारण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ (यूएनएफपीए) या संस्थेकडून २०११ मध्ये ही वेबसाइट सुरू केली हाेती. ती हाताळण्याची जबाबदारी ‘परामर्श‎ सोल्युशन्स’ या संस्थेला दिली होती.

तीन वर्षांपासून बैठकही झाली नाहीएकतर मुलींची संख्या कमी झाली आहे. लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून मुले माेर्चे काढत आहेत, तरीही शासन दखल घेत नाही. गर्भलिंग निदानाबाबत स्टेट सुपरवायजरी बाेर्डची मीटिंग गेल्या तीन वर्षांपासून झाली नाही. ‘आमची मुलगी’ या वेबसाइटला जर संस्थेने फंडिंग थांबवले हाेते, तर शासनाने का सुरू कले नाही. पुन्हा एकदा वेबसाइट सुरू करावी.- वर्षा देशपांडे, केंद्रीय सदस्य, नॅशनल इन्स्पेक्शन अँड माॅनिटरिंग कमिटी

पुन्हा सुरू हाेण्याची शक्यता नाही !हे संकेतस्थळ पूर्ववत करण्याच्या अनुषंगाने आराेग्य विभागाने ‘परामर्श साेल्युशन्स’ या संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही. वेबसाइटचे सर्व टेक्निकल डिटेल त्यांच्याकडेच आहेत. ते पुन्हा मिळणेही अवघड असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

वेबसाइट का बंद पडली?‘यूएनएफपीए’कडून आराेग्य विभागाला आर्थिक साहाय्य मिळत हाेते, ते २०१९ पासून थांबवले गेले. त्यामुळे संकेतस्थळाला देण्यात‎ येणारे आर्थिक साहाय्यही २०१९ पासून बंद‎ केले गेले. त्याचदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या आराेग्य व कुटुंब कल्याण विभागानेही ही वेबसाइट सुरू राहण्यासाठी काही निधी दिला नाही. परिणामी २०१९ पासून ही वेबसाइट बंदच आहे. 

केवळ हेल्पलाइनवरच करा तक्रारगर्भलिंग निदान याबाबत तक्रार करण्यासाठी १८००-२३३-४४७५ ही हेल्पलाइन आहे. त्यावर तक्रार करता येते. काेणत्याही जिल्ह्यातून तक्रार आल्यास ती नाेंदवून घेऊन ती पुढे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवली जाते.

टॅग्स :Healthआरोग्य