शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Upsc: राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त मृणाली जोशीला राज्यपालांकडून 'विठ्ठलाची' मूर्ती भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 21:15 IST

मृणालीने आई वडिलांसह राज्यपालांची राजभवन पुणे येथे भेट घेतली.

ठळक मुद्देमृणाली आता २४ वर्षांची असून विशेष म्हणजे तिने दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त केले

पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या मृणाली जोशीचे पेढा भरवून कौतुक केले. राज्यपालांनी मृणालीला विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मृणालीने आई वडिलांसह राज्यपालांची बुधवारी  राजभवन पुणे येथे भेट घेतली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून मुख्य परीक्षेचा निकालात ७६१ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. यामध्ये नागपूरच्या मृणाली जोशीने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर देशात ३६ वा क्रमांक मिळवला आहे.

मृणाली आता २४ वर्षांची असून विशेष म्हणजे तिने दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त केले आहे. मृणालीने तिचे बारावीपर्यतचे शिक्षण अभिनव विद्यालयातून तर बीए (ईकॉनॉमिक्स) फर्ग्युसन महाविद्यालयातून २०१८ मध्ये पूर्ण केले. 

''वाचन, लिखाण, चित्रकला, स्वअभ्यास अशा छंदांमुळे यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवता आले. माझ्या आई-वडिलांनी मला माझ्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी दिल्याने आज सनदी अधिकारी म्हणून लोकसेवा करायची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया मृणालीने दिली आहे.''

टॅग्स :Puneपुणेupscकेंद्रीय लोकसेवा आयोगWomenमहिलाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीexamपरीक्षा