शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची मध्यस्थी आवश्यक, पाणी तोडण्याचा दिला होता इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:23 IST

जलसंपदा विभागाच्या थकबाकी वसुली मोहिमेमुळे पुण्याच्या पाण्यावर पुन्हा एकदा संकट आले आहे. जलसंपदा विभागाला त्यांचा वेतनासहितचा खर्च कालवा पट्टी तसेच पाणीबिलातून भागवण्याच्या आदेश राज्य सरकारने दिल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे : जलसंपदा विभागाच्या थकबाकी वसुली मोहिमेमुळे पुण्याच्या पाण्यावर पुन्हा एकदा संकट आले आहे. जलसंपदा विभागाला त्यांचा वेतनासहितचा खर्च कालवा पट्टी तसेच पाणीबिलातून भागवण्याच्या आदेश राज्य सरकारने दिल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारनेच हा निर्णय घेतला असल्यामुळे आता यात सरकारनेच मध्यस्थी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.तब्बल ३५४ कोटी रुपयांची थकबाकी जमा केली नाही, तर २० मार्चला पाणी देणे बंद करण्याचा लेखी इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. महापालिका जेवढे पाणी घेत असते, तेवढेच बिल पाठवल्याचा त्यांचा दावा आहे; तर जलसंपदाचे बिल अयोग्य पद्धतीने लावले असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. या विषयात गुंतागुंतीच्या अनेक गोष्टी असल्याची माहिती चौकशी केली असता समजली. त्यामध्ये जुन्या बेबी कालव्याचे भाडे महापालिकेला लावण्यापासून ते आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी उचलण्यापर्यंत अनेक गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे दिलेले पाणी मोजण्यात चूक होत असल्याचेही यात निदर्शनास येते.पुणे शहरासाठी म्हणून महापालिकेच्या वतीने खडकवासला धरणातून रोज १ हजार १५० दशलक्ष लिटर पाणी (एमएलडी) उचलण्याची परवानगी आहे. प्रत्यक्षात ते १ हजार ३५० एमएलडी पाणी उचलले जाते. गेल्या काही महिन्यांमध्ये तर महापालिकेच्या वतीने १ हजार ६५० एमएलडीपेक्षा जास्त पाणी उचलले जाते, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. पाणीवापर नियंत्रित करण्याबाबत अनेकदा पत्र देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.पाणीपुरवठा करण्यासाठी जो जुना बेबी कालवा तयार करण्यात आला होता, त्यामधून महापालिकेने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन टाकली आहे. पुण्यापर्यंत हे पाणी त्यामुळे बंद पाईपलाईनमधून येते. कालवा जलसंपदा विभागाचा आहे. त्यांनी १९९७ पासून महापालिकेला त्याचे भाडे लावण्यास सुरुवात केली असून थकबाकीतील ७० कोटी रुपये त्याचेच आहेत. नाममात्र १ रुपया भाडे लावण्याचे ठरले असतानाही जलसंपदाकडून ही जादा थकबाकी लावली जात असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.पाणी चुकीच्या पद्धतीने मोजले जाते, हा महापालिकेचा आरोप चुकीचा असल्याचे जलसंपदामधील काही वरिष्ठ अभियंत्यांनी सांगितले. धरणातून पाणी बरोबर जाते; मात्र त्यांच्या पाईपलाईनला गळती आहे. किमान २० टक्के पाणी गळत असल्याचे या अभियंत्याचे म्हणणे आहे. महापालिकेने मात्र या अभियंत्याने संपूर्ण जलवाहिनी फिरून त्याची पाहणी करून व गळती असले तर महापालिका सर्व बिल अदा करेल, असे आव्हानच दिले आहे. बंद पाईपलाईनला कुठेही गळती नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे.१९९७मध्ये महापालिकेनेच ८९ टक्के घरगुती पाणीवापर व ११ टक्के व्यावसायिक कारणासाठी, असे लेखी दिले आहे. त्यामुळे जलसंपदाने त्याप्रमाणे फरकाची आकारणी केली.>ग्रामीण भागाचाही पाण्यावर हक्कजलसंपदा विभागालाही त्यांचा खर्च कालवा पट्टी व पाणी बिलातून करण्यास सांगण्यात आले असल्याचे मान्य आहे. मात्र, त्यात काही गैर नाही, असे वरिष्ठ अभियंत्यांचे म्हणणे आहे. धरणे ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करण्याची तसेच त्यातील पाण्याचे समान वाटप करण्याची जबाबदारी जलसंपदा खात्यावर आहे. त्यासाठी शुल्कआकारणी करण्यात येते तर त्यातून खर्च भागवणेच योग्य आहे, असे मत एका वरिष्ठ अभियंत्याने व्यक्त केले. महापालिकेचा जास्त पाणीवापर हा पुण्यानंतरच्या ग्रामीण भागावर केलेला अन्याय आहे. त्यांना शेती तसेच पिण्यासाठी पाणी याच धरणातून पुरवले जाते. त्यामुळे त्यांचाही त्यावर हक्क आहे, असे जलसंपदाचे म्हणणे आहे.पाण्याचे बिल आकारणे ही जलसंपदाची जबाबदारीच आहे. ते चुकीचे असेल तर महापालिकेने योग्य पद्धतीने मागणी करावी. जलसंपदाच्या १५० पेक्षा जास्त ग्राहकांपैकी महापालिका एक ग्राहक आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आमचे काम आहे; मात्र त्यांनी ते व्यवस्थित मांडावे. बिलामध्ये कोणतीही चूक नाही, ते योग्यच आहे. - पांडुरंग शेलार कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभागखडकवासला धरण ते पर्वती या संपूर्ण अंतरात कुठेही पाईपलाईनला गळती नाही. बेबी कॅनॉलच्या वापराचे भाडे आकारणे व तेही अवाजवी, हे अयोग्य आहे. आम्ही बिल तपासणीची मागणी केली आहे. वरिष्ठ स्तरावर याबाबत निर्णय घेतला जाईल. - व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग महापालिका

टॅग्स :Puneपुणे