शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination Pune : १ मे पासून खासगी रुग्णालयांना लस पुरवठा बंद; पुण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणालाच प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 18:45 IST

महापौर मुरलीधर मोहोळ यांची महत्वपूर्ण घोषणा.

पुणे : पुणे शहरातल्या लसीकरणाचा गोंधळ अजुनही कायम आहे. कमी येत असलेल्या लसींमुळे आता १ तारखेपासुन सरसकट लसीकरण कसं करणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आता मात्र पुणे महापालिकेने १ तारखेनंतर देखील ज्येष्ठ नागरिकांचेच प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या डोस घेणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे. 

पुणे शहरांमध्ये लसीकरण मोहिमेने सुरुवातीला वेग घेतला होता. मात्र नंतर येणाऱ्या लसीची संख्या कमी झाल्याने अगदी थोड्या लोकांना लस मिळायला सुरुवात झाली होती. अपॅाईंटमेंट घेऊनही अनेक नागरिकांना स्टॅाक नसल्याने परत फिरावं लागत होतं. थेट वॉक इन लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. 

याच पार्श्वभूमीवर आता १ तारखेपासूूून १८ वर्षांच्या वरच्या नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे. हे सुरु झाल्यानंतर दुसऱ्या डोसचे लसीकरण कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत सोमवारी(दि.२६) अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये लसीकरणात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

याविषयी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले “ २८ दिवसांत जवळपास ४ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापुढे लस कमी असल्याने प्राधान्याने १ तारखेनंतर १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरु होईल त्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सरकारच्या आदेशानंतर १ तारखेनंतर खासगी रुग्णालयाला लस पुरवली जाणार नाही. त्यामुळे आता महापालिकेला आलेल्या सगळ्या लसी महापालिकेच्या केंद्रावर वापरली जातील “ 

दरम्यान, वैकुंठ आणि कैलास स्मशानभूमीमध्ये नवीन विद्युत दाहिनी बसवणार असल्याचेही महापौरांनी जाहीर केले. तसेच महापौर निधी मधून १०० नवीन व्हेंटिलेटर खरेदी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस