शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचा मार्ग थेट दिल्ली नाही व्हाया अयोध्या : हुकूमचंद सावला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 12:06 IST

देशातील १०० कोटी भारतवासियांची वज्रमूठ जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मंदिर निर्माणाचे कार्य अशक्य आहे...

ठळक मुद्देविश्व हिंदू परिषद पुणेतर्फे धर्मसभेचे आयोजन 

पुणे : रामजन्मभूमी हा सर्वांच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अयोध्येमध्ये राममंदिराची उभारणी करु शकते, त्याकरीता न्यायालय किंवा समाजाला विचारण्याची गरज नाही. आता देशामध्ये सत्तेत जाण्याचा मार्ग थेट दिल्ली नसून व्हाया अयोध्या आहे. त्यामुळे कॉंग्रेससह प्रत्येक पक्षाचे राजकारणी येथे येत आहेत. राष्ट्रीय चरित्र निर्मितीकरीता राममंदिर आवश्यक आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकूमचंदजी सावला यांनी केले. विश्व हिंदू परिषद पुणेच्या वतीने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिर निर्माणासाठी संसदेत कायदा करावा, या मागणीसाठी पुण्यात बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले.  यावेळी कागशिला पिठाधिश्वर  महंत साध्वी प्रज्ञा भारतीय जी, प.पू. अतुलशास्त्री भगरे गुरुजी, दादा वेदक, पांडुरंग राऊत, रवींद्र वंजारवाडकर, सभेचे संयोजक किशोर चव्हाण, श्रीकांत चिल्लाळ यांसह संत महात्म्य उपस्थित होते. खासदार अनिल शिरोळे यांना राममंदिर निर्माण कायद्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. साध्वी प्रज्ञा भारतीय म्हणाल्या, भारत देश स्वतंत्र झाला, नागरिक स्वतंत्र झाले, मात्र आजही रामलल्ला स्वतंत्र नाही. हिंदूंनी संघटित होऊन राममंदिर निर्माणाकरीता पुढाकार घ्यायला हवा. राज्य व केंद्र सरकारने जर ठरविले, तर मंदिर उभारणी सहज शक्य आहे. तीन तलाक सारखा कायदा न्यायालय करु शकते, मग राममंदिर निर्माणाचा कायदा का होऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला.     प.पू.अतुलशास्त्री भगरे गुरुजी म्हणाले, देशातील १०० कोटी भारतवासियांची वज्रमूठ जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मंदिर निर्माणाचे कार्य अशक्य आहे. सरकारच्या भरवशावर राहणे योग्य नाही. कोणाला न दुखावता राममंदिर होणार नाही. त्यामुळे मंदिर निर्मितीकरीता रामभक्तांची शक्ती एकवटली पाहिजे़खासदार अनिल शिरोळे यांनी देखील राममंदिर उभारणीकरीता सरकार आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. धनंजय गायकवाड, नितीन महाजन, अतुल सराफ, गणेश वनारसे, नाना क्षीरसागर, केतन घोडके, श्रीपाद रामदासी आदींनी सभेच्या आयोजनात सहभाग घेतला. मंदार परळीकर यांनी सूत्रसंचालन केले. उत्तमराव उर्फ भाऊराव कुदळे यांनी प्रास्ताविक केले. किशोर चव्हाण यांनी निवेदनाचे वाचन केले. श्रीकांत चिल्लाळ यांनी आभार मानले.   

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरGovernmentसरकार