शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमधील ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याचे शासनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:15 IST

पुणे : जिल्हा परिषद ग्रामीण क्षेत्रातील महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना हवेली आणि मुळशी तालुक्‍यांच्या बाहेरील ...

पुणे : जिल्हा परिषद ग्रामीण क्षेत्रातील महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना हवेली आणि मुळशी तालुक्‍यांच्या बाहेरील तालुक्‍यांमध्ये समुपदेशन करून नेमणुका देण्याच्या सूचना शासनाने दिले आहेत. त्यामुळे नियतकालिक बदल्यांची प्रक्रिया पार पडण्यापूर्वी ग्रामविकास अधिकारी दर्जाचे ग्रामपंचायत सजे निश्चित करून ज्या ग्रामसेवकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.

२३ गावांचा समावेश महापालिकेत झाल्यामुळे या गावांमधील ग्रामसेवक हवेली आणि मुळशी तालुक्यामध्ये अतिरिक्त झाले आहेत त्यांच्याबद्दल यासंदर्भात जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागाकडून मार्गदर्शन मागवले होते. शासनाने यासंदर्भात जिल्हा परिषदेला या ग्रामसेवकांच्या नियुक्त्या कशा पद्धतीने कराव्यात या संदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

हवेली तालुक्यातील अतिरिक्त ग्रामसेवकांना समुपदेशन करून बाहेरच्या तालुक्यांमध्ये नेमणूक दिली जाईल त्याच धर्तीवर मुळशी तालुक्यातील अतिरिक्त ग्रामसेवकांच्या नेमणुका देखील होणार आहेत. सद्यस्थितीमध्ये हवेली आणि मुळशी तालुक्यात एकही जागा रिक्त नाही त्यामुळे या ग्रामसेवकांना हे दोन तालुके सोडून बाहेरच्या तालुक्यांमध्ये समुपदेशन पद्धतीने नियुक्ती दिली जाईल असे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

जिल्हा परिषद कर्मचारी तसेच ग्रामसेवक यांच्या नियतकालिक बदल्या १५ टक्के या यादीमध्ये ३१ जुलैपूर्वी करायच्या आहेत. त्या अगोदर या २३ ग्रामपंचायतींमधील अतिरिक्त ग्रामसेवकांच्या निवडणुकांची प्रक्रिया केली जाणार आहे. मुळशी आणि हवेली गटविकास अधिकाऱ्यांकडून या ग्रामसेवकांना अनेक प्रकरणांमध्ये पाठीशी घातले गेले. परंतु यातील अनेक ग्रामसेवकांच्या खाते अंतर्गत चौकशी देखील सुरू आहेत.