शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

पाबळ येथील मस्तानीच्या ऐतिहासिक स्मृती स्थळाकडे शासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 19:08 IST

मस्तानीची कबर व परिसर त्याचबरोबर गढीची जागा पाहून त्यांनी खंत व्यक्त  

ठळक मुद्देमस्तानीच्या सातव्या, आठव्या व नवव्या पिढीतील वंशज यावेळी उपस्थित मस्तानीची कबर व परिसर त्याचबरोबर गढीची जागा पाहून खंत व्यक्त

शिक्रापूर : पाबळ येथील ऐतिहासिक मस्तानीच्या स्मृतिस्थळाची इंदूर, भोपाळ व सिहोर येथे सध्या वास्तव्यास असणाऱ्या मस्तानीच्या वंशजांनी भेट देऊन पाहणी केली. मस्तानीच्या सातव्या, आठव्या व नवव्या पिढीतील वंशज यावेळी उपस्थित होते. मस्तानीची कबर व परिसर त्याचबरोबर गढीची जागा पाहून त्यांनी खंत व्यक्त करून मस्तानीची गढी व कबर ही मराठा इतिहास व साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा असून ही स्मारके जतन करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने जास्तीत जास्त प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे या वंशजांनी सांगितले. पुणे येथे ‘मस्तानी जीवन शोध’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर मस्तानीचे सातवे, आठवे व नववे वंशज आपल्या कुटुंबीयांसह पाबळ येथे आले होते. रावेरखेडी (मध्य प्रदेश) येथे मध्य प्रदेश पर्यटन विभागाने उत्कृष्ट काम करीत या परिसराचा विकास केला आहे. मात्र, पाबळ येथील मस्तानीचे ऐतिहासिक इमारतीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या ऐतिहासिक गावाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला पाहिजे. पाबळ ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून उदयाला आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. या वेळी मस्तानीचे वंशज फिरोज सुलतान, तमकीन अली बहादूर, जुबेर बहादूर जोश, बहादूर जुनेद, अली बहादूर अलमास, सुलतान सना, अली बहादूर इरफान, अली बहादूर असलाम, तस्किन अली बहादूर, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद गायकवाड, बाजीराव मस्तानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय डहाळे, संचालक चंद्रशेखर वारघडे, धनंजय गावडे, प्रशांत मैड, उपसरपंच संजय चौधरी, सरपंच पल्लवी डहाळे, माजी सरपंच शारदा चौधरी, रंजना डहाळे, अविनाश क्षीरसागर,  प्राचार्य डॉ. संजय घोडेकर आदी उपस्थित होते.  .........ग्रामस्थांनी मूळ वस्तूंची छायाचित्रे दाखवत माहिती दिली. येथील परिस्थिती बघून झालेल्या कामाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत स्मृतिस्थळाचे मूळ स्वरूप परत निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी ‘लोकमत’शी बोलताना जुबेर बहादूर जोश यांनी, स्थानिक मस्तानी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हे ऐतिहासिक ठिकाण चांगल्याप्रकारे सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे सांगितले 

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरhistoryइतिहास